प्रश्नसंच ५६ - [सामान्य विज्ञान]

[प्र.१] घरातील सिलेंडरमध्ये LPG वायू कोणत्या स्थितीत असतो?
१] स्थायू
२] द्रव
३] वायू
४] स्थायू आणि द्रव

उत्तर
२] द्रव
------------------
[प्र.२] समुद्राचे खारट पाणी कोणत्या प्रक्रियेने शुद्ध करतात?
१] बाष्पीभवन
२] उर्ध्वपातन
३] प्रभाजी उर्ध्वपातन
४] उत्कलन

उत्तर
२] उर्ध्वपातन
------------------
[प्र.३] चुकीचे विधान ओळखा.
अ] मिथेन छपाईची शाई तयार करण्यासाठी वापरतात.
ब] ग्लिसरीन डायनामाईट तयार करण्यासाठी वापरतात.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] एकही नाही

उत्तर
४] एकही नाही
------------------
[प्र.४] पावसाचे पाणी खडकांवर पडल्यावर काय होते?
1] पाण्यात सोडियम क्लोराईड मिसळते.
२] पाण्यात सोडियम कार्बोनेट मिसळते.
३] पाण्यात नायट्रोजन वायू मिसळतो.
४] पाण्यात कॅल्शियम कार्बोनेट मिसळते.

उत्तर
४] पाण्यात कॅल्शियम कार्बोनेट मिसळते.
------------------
[प्र.५] कोणत्या प्रक्रियेने कच्च्या तेलापासून गेसोलीन मिळवतात?
१] बाष्पीभवन
२] उर्ध्वपातन
३] प्रभाजी उर्ध्वपातन
४] उत्कलन

उत्तर
३] प्रभाजी उर्ध्वपातन
------------------
[प्र.६] खालीलपैकी कोणत्या द्रावणातून विद्युतधारा वाहते?
१] ग्लिसरीन
२] अल्कोहोल
३] युरिया
४] हायड्रोक्लोरिक आम्ल

उत्तर
४] हायड्रोक्लोरिक आम्ल
------------------
[प्र.७] टंगस्टन स्टील मध्ये खालीलपैकी काय नसते.
अ] लोह
ब] कार्बन
क] निकेल
ड] टंगस्टन
इ] क्रोमियम

१] ब आणि क
२] फक्त क
३] क आणि इ
४] ब आणि इ

उत्तर
३] क आणि इ
------------------
[प्र.८] चुकीचे विधान ओळखा.
१] सोने मूलद्रव्याचा अणुअंक ७९ असतो.
२] सोने मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक १९७ असतो.
३] सोने नायट्रिक आम्ल आणि हायड्रोक्लोरिक आम्लाच्या संहत द्रावणात विरघळतो.
४] २२ कॅरेट सोन्याच्या दागिन्यात ९८% सोने असते.

उत्तर
४] २२ कॅरेट सोन्याच्या दागिन्यात ९८% सोने असते.
[२२ कॅरेट सोन्याच्या दागिन्यात ९१%-९५% सोने असते.]

------------------
[प्र.९] असत्य विधाने ओळखा.
अ] फॉस्फोरस हा चकाकण्याची क्षमता असणारा धातू आहे.
ब] फॉस्फोरसचा शोध ब्रॅंड या शास्त्रज्ञाने लावला.
क] फॉस्फोरस अत्यंत क्रियाशील असून तो निसर्गात मुक्त स्थितीत आढळत नाही.

१] फक्त अ
२] अ आणि ब
३] ब आणि क
४] एकही नाही

उत्तर
१] फक्त अ
[फॉस्फोरस हा चकाकण्याची क्षमता असणारा अधातू आहे.]

------------------
[प्र.१०] चुकीचे विधान ओळखा.
अ] ऑक्सिजनचा शोध जोसेफ प्रिस्टले या शास्त्रज्ञाने लावला.
ब] पोटॅशियम डायऑक्साईड आणि सोडियम बायकार्बोनेट यापासून ऑक्सिजनची निर्मिती करतात.
क] वेल्डिंग करताना असेटिलिन बरोबर वापर करतात.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] ब आणि क
४] एकही नाही

उत्तर
२] फक्त ब
-------------------------------------------------------------