प्रश्नसंच २३ - [भूगोल]

---------------------------------------------------
[प्र.१] दख्खन पठाराची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झाली?
१] भेगी उद्रेक
२] भूकंप
३] समांतर हालचाली
४] यापैकी नाही

उत्तर
१] भेगी उद्रेक
----------------
[प्र.२] महाराष्ट्राची पूर्वेकडील नैसर्गिक सीमा ओळखा.
१] गारो, खासी, जैतीया
२] भामरागड-चिरोलि-गायखुरी
३] सातमाळा
४] मेळघाट

उत्तर
२] भामरागड-चिरोलि-गायखुरी
----------------
 [प्र.३] चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या प्रकारचे लोहखनिज आढळते?
१] लिग्नाईट
२] मॅग्नेटाईट
३] हेमेटाईट
४] सिडेराईट

उत्तर
३] हेमेटाईट
----------------
[प्र.४] महाराष्ट्र पठारावरील अवर्षणग्रस्त प्रदेशात पावसाचे प्रमाण किती दरम्यान आहे?
१] २५ ते ६० सेमी
२] ५० ते ७५ सेमी
३] ३० ते ८० सेमी
४] २५ ते ५० सेमी

उत्तर
४] २५ ते ५० सेमी
----------------
[प्र.५] उत्तर गोलार्धात दिनमानाचा कालावधी कधीपासून वाढत जातो?
१] २२ जून
२] २१ मार्च
३] २२ मार्च
४] २१ जून

उत्तर
२] २१ मार्च
----------------
[प्र.६] सह्याद्री पर्वताच्या घाटमाथ्यावर उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास पावसाचे प्रमाण _ _ _ _ _ _ _ _ _ _
१] तेवढेच राहते
२] वाढत जाते
३] कमी होत जाते
४] फारसा फरक पडत नाही

उत्तर
२] वाढत जाते
----------------
[प्र.७] तौला शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे?
१] नाशिक
२] पुणे
३] धुळे
४] नंदुरबार

उत्तर
१] नाशिक
----------------
[प्र.८] शेत जमिनीचा कमाल वापर व अधिक काल शेती हा मुख्य उद्देश कशाचा आहे?
१] वृक्षारोपण
२] वन शेती
३] शेती योजना
४] सामाजिक वनीकरण

उत्तर
२] वन शेती
----------------
[प्र.९] उसाचे आडसाली पिक किती महिन्यांनी तयार होते?
१] १५
२] १८
३] २४
४] १२

उत्तर
२] १८
----------------
[प्र.१०] सन १९५१ मध्ये मुंबई राज्यात एकूण किती जिल्हे होते?
१] २८
२] ३२
३] ३८
४] ४६

उत्तर
१] २८
-------------------------------------------------------------