प्रश्नसंच ३० - [पंचायत राज]


[प्र.१] स्थानिक स्वराज्य संस्था सुरु करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
१] महाराष्ट्र
२] उत्तर प्रदेश
३] मध्य प्रदेश
४] राजस्थान


उत्तर
४] राजस्थान
------------------
[प्र.२] द्विस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस कोणत्या समितीने केली?
१] वसंतराव नाईक समिती
२] अशोक मेहता समिती
३] बलवंतराय मेहता समिती
४] एन.डी.चेलय्या समिती


उत्तर
२] अशोक मेहता समिती
------------------
[प्र.३] त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेतील कोणत्या स्तराला बलवंतराय मेहता समितीने जास्त महत्व दिले?
१] जिल्हा परिषद
२] ग्रामपंचायत
३] पंचायत समिती
४] ग्रामसभा


उत्तर
३] पंचायत समिती
------------------
 [प्र.४] त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेतील कोणत्या स्तराला वसंतराव नाईक समितीने जास्त महत्व दिले?
१] जिल्हा परिषद
२] ग्रामपंचायत
३] पंचायत समिती
४] ग्रामसभा


उत्तर
१] जिल्हा परिषद
------------------
[प्र.५] 'पंचायत राजच्या विकासासाठी पंचायत समितीचे अस्तित्व आवश्यक आहे. त्यामुळे ती बरखास्त करण्यात येऊ नये' अशी शिफारस कोणत्या समितीने केली?
१] बलवंतराय मेहता समिती
२] पी.बी.पाटील समिती
३] ल.ना.बोंगिरवार समिती
४] एल.एम.सिंघवी समिती


उत्तर
३] ल.ना.बोंगिरवार समिती
------------------
[प्र.६] 'ग्रामपंचायतीवर पंचायत समितीचे नियंत्रण असावे' अशी शिफारस कोणत्या समितीने केली?
१] बलवंतराय मेहता समिती
२] पी.बी.पाटील समिती
३] ल.ना.बोंगिरवार समिती
४] वसंतराव नाईक समिती


उत्तर
१] बलवंतराय मेहता समिती
------------------
 [प्र.७] ‘सहकार हा विषय जिल्हा परिषदेकडे असू नये’ अशी शिफारस कोणत्या समितीने केली?
१] अशोक मेहता समिती
२] बलवंतराय मेहता समिती
३] हनुमंतय्या समिती
४] वसंतराव नाईक समिती


उत्तर
१] अशोक मेहता समिती
------------------
 [प्र.८] न्यायपंचायत संपुष्टात आणण्याची शिफारस कोणत्या समितीने केली?
१] बाबुराव काळे समिती
२] ल.ना.बोंगिरवार समिती
३] पी.बी.पाटील समिती
४] एल.एम.सिंघवी समिती


उत्तर
२] ल.ना.बोंगिरवार समिती
------------------
[प्र.९] ला.ना.बोंगिरवार समितीच्या शिफारशीबाबत खालील विधाने लक्षात घ्या.
अ] ५०० पेक्षा कमी लोकसंख्येसाठी ग्रामपंचायत स्थापन करू नये.
ब] नियोजन कार्यासाठी उपमुख्य कार्यकारी हे पद निर्माण करण्यात यावे.
वरीलपैकी कोणती शिफारस ला.ना.बोंगिरवार समितीने केली नाही?
१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] वरीलपैकी एकही नाही


उत्तर
४] वरीलपैकी एकही नाही
------------------
 [प्र.१०] प्रशासकीय सुधारणा आयोगाने खालीलपैकी कोणत्याशिफारसी केल्या होत्या?
अ] पंचायत राज व्यवस्थेमध्ये जिल्हा या स्तराला जास्त महत्व असावे.
ब] ग्रामसभेच्या वर्षातून किमान २ बैठका व्हाव्यात.
क] ग्रामपंचायतीचे सदस्य हे पंचायत समितीचे पदसिद्ध सदस्य असावे.

१] फक्त अ
२] फक्त अ व ब
३] फक्त अ व क
४] वरील सर्व


उत्तर
४] वरील सर्व
-------------------------------------------------------------