प्रश्नसंच ४० - [जीवशास्त्र]

[प्र.१] सजीवांच्या वर्गीकरण शास्त्राचा जनक कोण?
१] कार्ल लिनिअस
२] अरीस्टॉटल
३] थिओफ्रॅट्स
४] चार्ल्स डार्विन

उत्तर
१] कार्ल लिनिअस
------------------
[प्र.२] मानवी संतुलित आहार म्हणजे ......................
१] माशांच्या सेवनातून मिळणारी प्रथिने
२] मॅक्रो व मायक्रो पोषक द्रव्ये
३] तूप व दुधाचे पदार्थ
४] वाढीसाठी व संतुलित रहाण्यासाठी लागणारे पोषण द्रव्य

उत्तर
४] वाढीसाठी व संतुलित रहाण्यासाठी लागणारे पोषण द्रव्य
------------------
[प्र.३] जीवशास्त्रानुसार मृत्यू (Biological Death) केव्हा होतो?
१] हृदयाचे ठोके बंद होतात तेव्हा
२] श्वासोच्छवास बंद होतो तेव्हा
३] शरीरातील सर्व पेशी मरण पावतात तेव्हा
४] डोळ्यांमधील बाहुली स्थिर होते तेव्हा

उत्तर
३] शरीरातील सर्व पेशी मरण पावतात तेव्हा
------------------
[प्र.४] वटवाघूळ _ _ _ _ _ _ _ वर्गीय आहे.
१] पक्षी वर्गीय
२] सरीसृप वर्गीय
३] सस्तनी वर्गीय
४] उभयचर वर्गीय

उत्तर
३] सस्तनी वर्गीय
------------------
[प्र.५] पेशी चक्रामध्ये कोणत्या क्रिया घडतात?
१] समसुत्री आणि अर्धसुत्री विभाजन
२] G1, S Phase आणि G2
३] पुर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था आणि अंत्यावस्था
४] इंटरफेज आणि समसुत्री विभाजन

उत्तर
४] इंटरफेज आणि समसुत्री विभाजन
------------------
[प्र.६] झुरळाला पायाच्या किती जोड्या असतात?
१] ३ जोड्या
२] ४ जोड्या
३] २ जोड्या
४] ५ जोड्या

उत्तर
१] ३ जोड्या
------------------
[प्र.७] खालीलपैकी योग्य विधाने ओळखा.
अ] कवकांच्या अभ्यासाला मायक्रोलॉजी म्हणतात.
ब] कवकवर्गीय वनस्पती पारपोषी असतात.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] एकही नाही

उत्तर
३] वरील दोन्ही
------------------
 [प्र.८] अन्नसाखळीमध्ये खाली घटक असतात.
१] फक्त अन्न तयार करणारे
२] अन्न तयार करणारे व ते खाणारे
३] अन्न तयार करणारे , ते खाणारे तसेच विघटक
४] यापैकी नाही

उत्तर
३] अन्न तयार करणारे , ते खाणारे तसेच विघटक
------------------
[प्र.९] मानवी शरीरात RBC : WBC हे प्रमाण किती असते?
१] १: ७००
२] ७०० : १
३] १२०० : १
४] ९००० : १

उत्तर
२] ७०० : १
------------------
[प्र.१०] माणसाच्या १००Kg वजनाच्या शरीरात किती लीटर पाणी असते?
१] ५०
२] ६०
३] ७०
४] ८०

उत्तर
३] ७०
-------------------------------------------------------------