चालू घडामोडी - १९ नोव्हेंबर २०१४

·        ४५वा आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव (International Film Festival of India-IFFI) २० नोव्हेंबरपासून गोव्यात सुरू झाला. गोव्यात सलग अकरावेळा हा महोत्सव होत असून यापुढे महोत्सवासाठी गोवा हे कायमस्वरुपी ठिकाण असेल. ह्या महोत्सवात खालील पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
·        सर्वोत्तम चित्रपट - ४० लाख रुपयांचा हा पुरस्कार निर्माता आणि दिग्दर्शकांमध्ये विभागून दिला जाणार आहे.
·        दिग्दर्शकाला २० लाख रुपये रोख, सुवर्ण मयूर आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे तर निर्मात्याला २० लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र
·        सर्वोत्तम दिग्दर्शक - रजत मयूर, प्रमाणपत्र आणि १५ लाख रुपये रोख
·        सर्वोत्तम अभिनेता (पुरुष) - रजत मयूर, प्रमाणपत्र आणि १० लाख रुपये रोख
·        सर्वोत्तम अभिनेत्री (महिला) - रजत मयूर, प्रमाणपत्र आणि १० लाख रुपये रोख
·        विशेष ज्युरी पुरस्कार रजत मयूर, प्रमाणपत्र आणि १५ लाख रुपये रोख
·        जीवन गौरव पुरस्कार १० लाख रुपये रोख, प्रमाणपत्र, शाल
·        शताब्दी पुरस्कार (भारतीयांसाठी) - १० लाख रुपये रोख, प्रमाणपत्र, शाल, रजत मयूर
·        शताब्दी पुरस्कार  - १० लाख रुपये रोख, रजत मयूर, प्रमाणपत्र
·        ICC चे पुरस्कार २०१४
·        गारफील्ड सोबर्स आयसीसी क्रिकेटर ऑफ दि इयर : मिचेल जॉन्सन
·        आयसीसी टेस्ट क्रिकेटर ऑफ दि इयर : मिचेल जॉन्सन
·        आयसीसी पंच : रिचर्ड केटलबोर 
·        एल जी पीपल्स चॉइस : भुवनेश्वर कुमार 
·        महिला एकदिवसीय खेळाडू : साराह टेलर (इंग्लंड) 
·        एकदिवसीय खेळाडू : ए बी डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका)  
·        उदयोन्मुख खेळाडू : गॅरी बॅलन्स (इंग्लंड) 
·        असोसिएट अँड अॅफिलिएट क्रिकेटर ऑफ द इयर : प्रेस्टॉन मोम्मसेन (स्कॉटलंड) 
·        टी-२० इंटरनॅशनल परफॉर्मन्स ऑफ दि इयर : आरॉन फिन्च (ऑस्ट्रेलिया)  
·        टी-२० आंतरराष्ट्रीय महिला खेळाडू : मेग लॅनिन (ऑस्ट्रेलिया)   
·        स्पिरिट ऑफ द क्रिकेट अवॉर्ड : कॅथरिना ब्रंट (इंग्लंड)
·        पाणसुरुंग शोधून ते निकामी करणारी यंत्रणा असणाऱ्या नौका आयात न करता त्यांची बांधणी आता गोवा शिपयार्डमध्ये केली जाणार आहे.
·        मोदींनी ऑस्ट्रेलियाच्या संसदेत संयुक्त सभागृहाला संबोधित केले. असा सन्मान मिळालेले ते पहिलेच भारतीय पंतप्रधान ठरलेत.
·        आशियाई स्‍पर्धेत भारताला हॉकीमध्‍ये सुवर्णपदक मिळवून देणा-या प्रशिक्षक टेरी वॉल्श यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
·        भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) आठवे वार्षिक पुरस्कार जाहीर
·        भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांना कर्नल सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार
·        वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा पुरस्कार जाहीर
·        महाराष्ट्राच्या केदार जाधवला सर्वोत्तम फलंदाजीसाठी माधवराव शिंदे पुरस्कार जाहीर
·        बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात शिक्षा झालेल्या तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची आमदारकी रद्द करण्यात आली असून शिक्षेनंतरची ६ वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात आली आहे.
·        जगातील सर्वाधिक धम्माल अनुभवता येणाऱ्या शहरांमध्ये दिल्ली शहराला शेवटचे २५वे स्थान मिळाले आहे. तर या यादीत जर्मनीची राजधानी बर्लिन पहिल्या क्रमांकावर आहे.
·        मूळ भारतीय वंशाच्या असलेल्या अदिती हर्डिकर यांची व्हाइट हाऊसमधील लेस्बियन, गे, तृतीयपंथी, बायसेक्शुअल (एलजीबीटी) समाजाशी समन्वय साधण्याच्या दृष्टीने समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment