चालू घडामोडी - ८ व ९ डिसेंबर २०१४

·        कुलाबा ते सीप्झ या ३३.५ किलोमीटर लांबीच्या भुयारी मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी 'मुंबई मेट्रो रेल कापरेरेशन'ने 'एकॉम आशिया' या कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे.
·        भारताच्या जीसॅट - १६ या दळणवळण उपग्रहाचे फ्रेंच गयाना येथील कोरु अंतराळ संशोधन केंद्रावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.
·        या उपग्रहाचे वजन ३१८१.६ किलोग्रॅम आहे. या उपग्रहाचे प्रक्षेपण हवामानातील व्यत्ययामुळे २ दिवस लांबणीवर गेले.
·        ख्यातनाम गायिका आशा भोसले यांना दुबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाला.
·        टाईम नियतकालिकाच्या प्रभावी व्यक्तींच्या यादीत अग्रस्थान पटकावणाऱ्या नरेंद्र मोदी यांना “एशियन ऑफ द ईयर” म्हणून गौरविण्यात आले.   
·        पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रस्ताव मान्य करून संयुक्त राष्ट्रसंघ लवकरच २१ जून हा दिवस ‘जागतिक योग दिवस’ म्हणून मान्य करणार आहे अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली.
·        वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज भारतीय व्यापार पोर्टलचे www.indiantradeportal.in चे उद्घाटन केले.
·        भारतीय निर्यातदारांना भेडसावणाऱ्या समस्या, सर्वाधिक प्राधान्य असलेले देश याबाबतची सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे हा पोर्टलचा प्रमुख उद्देश आहे.
·        महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा लक्षात घेता “उबर” या अमेरिकन टॅक्सी कंपनीवर दिल्ली सरकारने बंदीचा निर्णय घेतला आहे.
·        गोल्डन ग्लोब या पुरस्काराच्या शर्यतीत “फँड्री” या मराठी चित्रपटाने अंतिम फेरीत स्थान मिळविले आहे.
·        परदेशी भाषेतील चित्रपटाच्या गटात निवड झालेल्या ५३ जागतिक चित्रपटांमध्ये “फँड्री” चा समावेश झाला आहे.
·        महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणाऱ्या वी.वी.बोकील स्मृत्यर्थ देण्यात येणारा बाल साहित्य विषयक पुरस्कार कवी “संदीप खरे” यांना देण्यात आला.
·        २०२० च्या टोकियो ऑलम्पिक मध्ये बेसबॉल व सॉफ्टबॉल हे खेळ पुन्हा समाविष्ट करण्यात येणार आहे.
·        हे खेळ बीजिंगमध्ये २००८ साली झालेल्या ऑलम्पिकमधून हद्दपार करण्यात आले होते.
·        आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीच्या मोनॅको येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
·        ला लीगा फुटबॉल स्पर्धेत लिओनेल मेस्सीने या स्पर्धेमध्ये ४०० गोल्सचा  विक्रमी टप्पा पूर्ण केला.
·        चौथ्या अंध विश्वकरंडक स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर मात करून विजेतेपद पटकावले.
वर्ष
विजेता
उपविजेता
१९९८
दक्षिण आफ्रिका
पाकिस्तान
२००२
पाकिस्तान
दक्षिण आफ्रिका
२००६
पाकिस्तान
भारत
२०१४
भारत
पाकिस्तान
·        राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी सुरु केलेल्या २५ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न सचिवांची परिषद दिल्ली येथे आयोजित करण्यात आली.
·        रामविलास पासवान या परिषदेच्या अध्यक्षस्थानी असतील.
·        स्वदेशी बनावटीच्या पिनाक मार्क-२ या रॉकेटच्या नवीन आवृत्तीची बालासोर (ओडिशा) येथील लष्करी तळावरून यशस्वी चाचणी घेण्यात आली.
·        या रॉकेटचा पल्ला ६० किलोमीटर इतका आहे.

1 comment: