चालू घडामोडी - ३ जानेवारी २०१५

·        ३ जानेवारी : सावित्रीबाई फुले जयंती, आधुनिक भारतातील प्रथम स्त्री शिक्षिका, समाजसुधारक, महात्मा जोतीराव फुले यांची पत्नी.
·        ३ जानेवारी : महिला मुक्ती दिन, बालिका दिन.
·        ३१ डिसेंबरच्या गुजरातजवळ अरबी समुद्रात स्फोटकांनी भरलेल्या पाकिस्तानी म‌च्छिमार नौकेचा छडा तटरक्षक दलाला लागला.
·        तटरक्षक दलाने तिचा पाठलाग सुरू करताच नौकेतील चौघांनी ती उडवूनच दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून, भारतावरील ‘१/१’ चा दहशतवादी हल्ला टळल्याचे बोलले जात आहे.
·        जर केंद्र सरकार मालवीय यांना मरणोत्तर भारतरत्न देऊ शकते तर महात्मा जोतिबा फुले आणि कांशीराम यांनाही मरणोत्तर भारतरत्न देऊन गौरविण्यात यावे अशी मागणी बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी लखनऊ येथे पत्रकार परिषदेत केली.
·        भूसंपादन वटहुकुमाची अंमलबजावणी करायची की नाही, याचा निर्णय घेण्याचा अधिकार कलम १० (अ) मधील तरतुदीनुसार राज्यांचा अधिकार आहे, असे केंद्रीय ग्रामविकास मंत्री चौधरी वीरेंद्र सिंह यांनी आज स्पष्ट केले.
·        नामवंत अर्थतज्ज्ञ अरविंद पनगारियाArvind Panagariya यांची ‘नीती आयोगा’चे पहिले उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
·        आयोगाच्या उर्वरित सदस्यांची नेमणूक पुढील आठवड्यात होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.
·        पंतप्रधानPradhanmantri Jan Dhan Yojna जनधन योजनेअंतर्गत आजपावेतो १०.३० कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत, अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयातर्फे देण्यात आली. त्यामुळे पंतप्रधानांनी घालून दिलेले १० कोटी खात्यांचे उद्दिष्ट २६ जानेवारीपूर्वीच पूर्ण झाले आहे.
·        वाहनांच्या सुट्या भागांचे उत्पादन करणाऱ्या पुण्याच्या भारत फोर्ज लि.ने फ्रान्समधील ‘मेकॅनिक्क जेनेराल लँग्रोआइज’ (‘एमजीएल’) ही कंपनी ११.८ दशलक्ष युरोंना (सुमारे ९० कोटी रुपये) खरेदी केली आहे.
·        आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने (आयबा) भारतात नव्याने स्थापन झालेल्या बॉक्सिंग इंडिया या संघटनेला मान्यता दिल्यानंतर आता भारत सरकारनेही ‘बॉक्सिंग इंडिया’ या नावाला हिरवा कंदिल दाखविला आहे.
·        मात्र अद्याप भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) बॉक्सिंग इंडियाला मान्यता दिलेली नाही.
·        ज्येष्ठ शास्त्रज्ञDr Vasant Gowarikar डॉ. वसंत गोवारीकर यांचे निधन झाले.
·        सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ते माजी कुलगुरू होते.
·        हवामान संशोधन, अवकाश आणि लोकसंख्या या क्षेत्रात त्यांचा संशोधनात्मक अभ्यास होता.
·        ते मराठी विज्ञान परिषदेचे काही काळ अध्यक्ष होते.
·        १९६५ मध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेमध्ये त्यांनी काम करायला सुरुवात केली. त्यांच्या नेतृत्वाखाली एसएलव्ही-२.५ हा उपग्रह वाहक तयार झाला.
·        विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव आणि १९९२ ते १९९३ या कालावधीत पंतप्रधानांचे विज्ञान सल्लागार म्हणून त्यांनी काम केले होते.
·        लोकसंख्येवर भाष्य करणारे ‘आय- प्रेडीक्ट’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध आहे.
·        ते महाराष्ट्र शासनाच्या ‘राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे’ अध्यक्ष होते.
·        त्यांना  पदमश्री आणि पदमभूषण पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.
·        वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी त्यांना केम्ब्रिज विद्यापीठाने डॉक्टरेटच्या प्रबंधांचे परीक्षक म्हणून नेमले होते.
·        छत्तीसगड सरकारने संपूर्ण राज्यात प्लॅस्टिकच्या पिशव्यांना संपूर्ण बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
·        दिल्लीतील अत्याचार प्रकरणामुळे वादात सापडलेल्या उबेर कॅबची चालकसेवा स्पेनमध्ये रद्द करण्यात आली आहे.
·        स्पेन कोर्टाच्या आदेशानंतर वेब आधारित सेवा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
·        तमिळनाडूमध्ये सुरू करण्यात आलेल्या स्वस्त दरातील “अम्मा” कॅन्टीनला प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि प्रतिसादही मिळाल्याने आता कर्नाटकातही अशाप्रकारचे “अम्मा” कॅन्टीन लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा