प्रश्नसंच १३४ - राज्यशास्त्र

MT Quiz
[प्र.१] अयोग्य जोडी ओळखा.
१] ३१वी घटनादुरुस्ती – १९७५
२] ४२वी घटनादुरुस्ती – १९७८
३] ५२वी घटनादुरुस्ती – १९८५
४] ५४वी घटनादुरुस्ती – १९८६


२] ४२वी घटनादुरुस्ती – १९७८
[४२वी घटनादुरुस्ती – १९७६]
----------------
[प्र.२] स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचे कामगार मंत्रिपद कोणी भूषविले?
१] राजकुमारी अमृता कौर
२] सरदार बलदेव सिंग
३] बाबू जगजीवनराम
४] मौलाना अबुल कलाम आझाद


३] बाबू जगजीवनराम
----------------
[प्र.३] मार्गदर्शक तत्वांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो?
अ] समान कामाला समान वेतन
ब] समान नागरी कायदा
क] छोट्या कुटुंबाला प्रोत्साहन

१] फक्त अ आणि ब
२] फक्त अ आणि क
३] फक्त ब आणि क
४] वरील सर्व


१] फक्त अ आणि ब
----------------
[प्र.४] मुलभूत कर्तव्यांना कशाचे पाठबळ नाही?
१] सामाजिक पाठबळ
२] नैतिक पाठबळ
३] राजकीय पाठबळ
४] कायदेशीर पाठबळ


४] कायदेशीर पाठबळ
----------------
[प्र.५] भारतात न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार कुणाला आहे?
१] फक्त सर्वोच्च न्यायालय
२] फक्त उच्च न्यायालय
३] सर्वोच्च व उच्च न्यायालय
४] भारतातील सर्वच न्यायालेये


१] फक्त सर्वोच्च न्यायालय
----------------
[प्र.६] खालीपैकी कोणत्या बाबी ब्रिटीश राज्यघटनेतून स्वीकारण्यात आल्या आहेत?
अ] कायद्याचे राज्य
ब] कायदेनिर्मितीची प्रक्रिया
क] संसदीय शासन

१] फक्त क
२] फक्त अ आणि क
३] फक्त ब आणि क
४] वरील सर्व


४] वरील सर्व
----------------
[प्र.७] १९५६ साली करण्यात आलेली ७वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित होती?
१] संपत्तीचा अधिकार
२] स्वातंत्र्याचा अधिकार
३] राज्य पुनर्रचना
४] वरीलपैकी नाही


३] राज्य पुनर्रचना
----------------
[प्र.८] राष्ट्रपतीला शपथ देण्यासाठी जर सरन्यायाधीश उपस्थित नसतील तर राष्ट्रपतीला कोण शपथ देतो?
१] उपराष्ट्रपती
२] पंतप्रधान
३] महान्यायवादी
४] सर्वोच्च न्यायालयाचे जेष्ठ न्यायाधीश


४] सर्वोच्च न्यायालयाचे जेष्ठ न्यायाधीश
----------------
[प्र.९] योग्य विधाने ओळखा.
अ] ८९व्या घटनादुरुस्तीने शिक्षणाचा अधिकार हा मुलभूत हक्क बनला.
ब] शिक्षण हा विषय ४२व्या घटनादुरुस्तीने समवर्ती सूचीत समाविष्ट करण्यात आला.

१] फक्त अ
२] फक्त ब
३] वरील दोन्ही
४] वरीलपैकी नाही


२] फक्त ब
[८६व्या घटनादुरुस्तीने शिक्षणाचा अधिकार हा मुलभूत हक्क बनला.]
----------------
[प्र.१०] योग्य विधान/विधाने ओळखा.
अ] भारतीय भाषांचा राज्यघटनेच्या परिशिष्ट आठ मध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे.
ब] महाराष्ट्रातील कोकणी, अहिराणी व मराठी या तीन भाषांना घटनेने मान्यता दिलेली आहे.
क] सध्या राज्यघटनेत समाविष्ट भाषांची संख्या २२ आहे.
ड] २००१ मध्ये केंद्र सरकारने आणखी एका भाषेचा घटनेमध्ये समावेश केला.

१] फक्त अ, ब आणि क
२] फक्त अ आणि क
३] फक्त अ, ब आणि ड
४] फक्त अ आणि ब


२] फक्त अ आणि क
----------------

२ टिप्पण्या: