प्रश्नसंच १३६ - सामान्य विज्ञान

MT Quiz
[प्र.१] अंडे पाण्यामध्ये ठेवले असता ते फुगते, पण जर ते मिठाच्या पाण्यात ठेवले तर त्याचे आकुंचन होते. हे खालीलपैकी कोणत्या गुणधर्मामुळे होते?
१] पृष्ठताण
२] अपवर्तनांक
३] प्रवाहीता
४] परासरण


४] परासरण
----------------
[प्र.२] हायड्रोमीटर हे उप्काराण खालीलपैकी काय मोजण्यासाठी वापरले जाते?
१] द्रव पदार्थाचे विशिष्ट गुरुत्व
२] द्रव पदार्थाची घनता
३] द्रव पदार्थाची तरलता
४] हवेतील हायड्रोजनचे प्रमाण


१] द्रव पदार्थाचे विशिष्ट गुरुत्व
----------------
[प्र.३] चंद्र क्षितिजाजवळ असताना मोठा दिसतो. याचे कारण म्हणजे ..........................?
१] दृष्टीभ्रम
२] वातावरणीय अपवर्तन
३] प्रकाशाचे विकिरण
४] प्रकाशाचे अपस्करण


१] दृष्टीभ्रम
----------------
[प्र.४] बाह्यशक्ती लावल्यावरदेखील जेव्हा एखादा पदार्थ आपला आकार बदलत नसेल तर त्या गुणधर्मास काय म्हणतात?
१] स्थितीस्थापकत्व
२] ताठरपणा (कठीणपणा)
३] लवचिकता
४] द्रवनियता


२] ताठरपणा (कठीणपणा)
----------------
[प्र.५] पुढीलपैकी कोणत्या कारणाने ध्वनी निर्मिती होते?
१] माध्यमातील कणांच्या कंपनामुळे
२] माध्यमातील कणांच्या घर्षणामुळे
३] माध्यमातील कणांच्या सरळ रेषेतील गतीमुळे
४] माध्यमातील कणांच्या परिवलन गतीमुळे


१] माध्यमातील कणांच्या कंपनामुळे
----------------
[प्र.६] दूरध्वनीवरून आवाजाचे दळणवळण करणाऱ्या पट्ट्याची रुंदी (बँडविड्थ) किती असली पाहिजे?
१] १० कि. हर्ट्झ
२] ६ कि. हर्ट्झ
३] ४ कि. हर्ट्झ
४] २०० कि. हर्ट्झ


३] ४ कि. हर्ट्झ
----------------
[प्र.७] क्ष किरण जास्त प्रमाणात शरीरावर पडल्यामुळे काय परिणाम होतो?
१] रक्तक्षय होतो.
२] उत्पादन क्षमता कमी होते.
३] आंतर रक्तस्त्राव होतो.
४] मानसिक दौर्बली येते.


१] रक्तक्षय होतो.
----------------
[प्र.८] सुपरसॉनिक विमाने आकाशात उडताना फारसा आवाज करत नाही कारण ..................
१] त्यांचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त असतो.
२] त्यांची कंपने कमी असतात.
३] ती फार उंचीवरून प्रवास करतात.
४] ती वजनाने फार हलकी असतात.


३] ती फार उंचीवरून प्रवास करतात.
----------------
[प्र.९] पाण्याच्या थेंबाविषयी खालीलपैकी बरोबर विधाने ओळखा.
अ] पाण्याच्या थेंबाचा आकार गोलाकार असण्यास पृष्ठताण कारणीभूत असतो.
ब] गुरुत्वाकर्षण नसतानाही पाण्याच्या थेंबाचा आकार गोल असतो.
क] जर पाण्याचे वस्तुमान ताणले गेले तर थेंब तयार होतात.

१] फक्त अ
२] फक्त क
३] फक्त अ आणि ब
४] वरील सर्व


४] वरील सर्व
----------------
[प्र.१०] योग्य विधान/विधाने ओळखा.
अ] गुरुत्व बल फक्त आकर्षण बल आहे.
ब] केंद्रकीय बल हे आकर्षण व प्रतिकर्षण बल असू शकते.
क] स्थिर विद्युत बल हे आकर्षण व प्रतिकर्षण बल असू शकते.
ड] गुरुत्व बल हे फक्त प्रतिकर्षण बल असते.

१] फक्त अ, ब आणि क
२] फक्त अ आणि क
३] फक्त ब, क आणि ड
४] फक्त ब आणि ड


२] फक्त अ आणि क
----------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा