प्रश्नसंच १३९ - इतिहास

MT Quiz [प्र.१] खालीलपैकी असत्य विधान ओळखा.
१] चंद्रगुप्त विक्रमादित्याने शकांना मारले.
२] समुद्रगुप्त यास भारताचा नेपोलियन म्हंटले जाते.
३] स्कंदगुप्ताने हुनांना पराभूत केले.
४] कुमारगुप्तने सुदर्शन सरोवर खुले केले.


४] कुमारगुप्तने सुदर्शन सरोवर खुले केले.
----------------
[प्र.२] बदामीच्या चालुक्यानंतर दख्खनमध्ये कोणाची सत्ता प्रस्थापित झाली?
१] चोल
२] होयसाळ
३] राष्ट्रकुट
४] यादव


३] राष्ट्रकुट
----------------
[प्र.३] ‘एझवा’ व ‘पुलया’ जमातीचा संघर्ष खालीलपैकी कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे?
१] वायकोम सत्याग्रह
२] अराब्बीपुरम आंदोलन
३] जस्टीस आंदोलन
४] गुरुवायूर सत्याग्रह


१] वायकोम सत्याग्रह
----------------
[प्र.४] खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा.
अ] १८५७च्या उठावाचे केंद्र कानपूर होते.
ब] १८५७च्या उठावाचे नेतृत्व बहादुरशहा-दुसरा याच्याकडे होते.
क] हा उठाव दक्षिण भारतात पसरला नव्हता.

१] फक्त अ आणि क
२] फक्त ब आणि क
३] फक्त अ
४] वरील सर्व


३] फक्त अ
----------------
[प्र.५] भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे प्रारंभीचे नाव काय होते?
१] भारतीय राष्ट्रीय संघटना
२] भारतीय राष्ट्रीय संघ
३] भारतीय राष्ट्रीय एकात्मता संघटना
४] भारतीय राष्ट्रीय एकात्मता मंच


२] भारतीय राष्ट्रीय संघ
----------------
[प्र.६] वेल्बी आयोग खालीलपैकी कशाशी संबंधित होता?
१] भारतीय खर्चाच्या समीक्षेसाठी
२] भारतीय नागरी सेवेच्या समीक्षेसाठी
३] भारतीय उद्योगाच्या परिस्थितीच्या समीक्षेसाठी
४] भारतीय रेल्वेच्या विकासाच्या समीक्षेसाठी


१] भारतीय खर्चाच्या समीक्षेसाठी
----------------
[प्र.७] खालीलपैकी कोणत्या सिद्धांताने भारतीय राष्ट्रवादाच्या विकासात महत्वाची भूमिका पार पाडली?
१] अनुअपस्थित संपृभूता सिद्धांत
२] धन निष्कासन सिद्धांत
३] अनुपस्थित जमीनदारी सिद्धांत
४] भारताचा दारिद्र्य सिद्धांत


२] धन निष्कासन सिद्धांत
----------------
[प्र.८] १८५७च्या उठावाचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य सांगता येतील?
अ] या उठावात पुन्हा एकदा दिल्लीला महत्व प्राप्त झाले.
ब] या उठावात हिंदू-मुस्लीम ऐक्याचा अभाव होता.
क] या उठावात शेतमजूर जमिनदारांसोबत लढले.
ड] या उठावात मोठ्या प्रमाणात स्त्रियांचा सहभाग होता.

१] फक्त अ आणि ब
२] फक्त ब आणि क
३] फक्त अ आणि क
४] फक्त ब आणि ड


३] फक्त अ आणि क
----------------
[प्र.९] १८५७ चे तात्कालिक कारण खालीलपैकी कोणत्या स्वरूपाचे होते?
अ] धार्मिक
ब] राजकीय
क] सैनिकी
ड] आर्थिक

१] फक्त अ आणि ब
२] फक्त ब आणि क
३] फक्त अ आणि क
४] फक्त ब आणि ड


३] फक्त अ आणि क
----------------
[प्र.१०] ‘इनाम कमिशन’ स्थापण्याचा खालीलपैकी कोणता एक उद्देश होता?
१] जहांगीरदारांना दिलेल्या जमिनीची चौकशी करणे.
२] नवीन जहांगीरदार नेमण्यासाठी चौकशी करणे.
३] जहांगीरदारांकडून जमिनी घेऊन जमीनदारांना देणे.
४] संपूर्ण जमिनीवर कंपनीची मालकी व्हावी यासाठी.


१] जहांगीरदारांना दिलेल्या जमिनीची चौकशी करणे.
----------------

1 comment: