प्रश्नसंच १५४ - चालू घडामोडीMT Quiz[प्र.१] अटलबिहारी वाजपेयी यांचा ‘फ्रेंड्स ऑफ बांगलादेश लिबरेशन वॉर अवॉर्ड’ पुरस्काराने सन्मान करण्याचा निर्णय बांगलादेश सरकारने घेतला आहे. याआधी हा पुरस्कार कोणत्या भारतीय पंतप्रधानांना मिळाला आहे?
१] पंडित जवाहरलाल नेहरू
२] मोरारजी देसाई
३] इंदिरा गांधी
४] राजीव गांधी


३] इंदिरा गांधी [२०१२]

[प्र.२] काही माजी क्रिकेटपटूंचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सल्लागार समितीत समावेश करण्यात आला आहे. खालीलपैकी कोणत्या खेळाडूचा या समितीत समावेश करण्यात आलेला नाही?
१] सचिन तेंडुलकर
२] व्हिव्हिएस लक्ष्मण
३] सौरव गांगुली
४] राहुल द्रविड


४] राहुल द्रविड

[प्र.३] कोणत्या भारतीय व्यक्तीची आशियाई ऍथलेटिक्स असोसिएशनच्या (एएए) उपाध्यक्षपदी निवड झाली आहे?
१] अशोक गुलाटी
२] अमित जैन
३] ललित भानोत
४] सुरेश कलमाडी


३] ललित भानोत

[प्र.४] ४९५ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या नोट करन्सी पेपर फॅक्ट्रीचे ३० मे २०१५ रोजी उद्घाटन करण्यात आले. हि फॅक्ट्री कोठे आहे?
अ] नाशिक 
ब] मुंबई 
क] होशंगाबाद
ड] सालेम


क] होशंगाबाद

[प्र.५] रेल्वेसाठी ‘इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी व्हिजन’ तयार करण्याची योजना रेल्वे मंत्रालयाने आखली असून, त्यासाठी एका सल्लागार मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या सल्लगार मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत?
अ] सुरेश प्रभू
ब] सोम मित्तल
क] आर. चंद्रशेखर
ड] मोहन रेड्डी


ब] सोम मित्तल

[प्र.६] वॉशिंग्टन येथे आयोजित ‘स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी’ या स्पर्धेत कोणत्या भारतीय स्पर्धकांनी विजेतेपद मिळविले?
अ] वान्या शिवशंकर आणि गोकूळ व्यंकटचलम
ब] कोल शेफर-रे आणि गोकूळ व्यंकटचलम
क] वान्या शिवशंकर आणि काव्या शिवशंकर
ड] वान्या शिवशंकर आणि कोल शेफर-रे


अ] वान्या शिवशंकर आणि गोकूळ व्यंकटचलम

[प्र.७] २७ मे २०१५ रोजी टोनी ब्लेअर यांनी मध्य-पूर्व गटाच्या विशेष राजदूत पदाचा राजीनामा दिला. ते कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान आहेत?
अ] जर्मनी
ब] फ्रांस
क] ब्रिटन
ड] बेल्जियम


क] ब्रिटन

[प्र.८] २९ मे २०१५ रोजी दूरदर्शनच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
अ] वीणा जैन
ब] अक्षय राउत
क] ललित भानोत
ड] सतीश रेड्डी


अ] वीणा जैन

[प्र.९] केंद्र सरकारने अर्थसंकल्पात प्रस्तावित केलेली सेवाकर वाढ १ जूनपासून अमलात येणार आहे. त्यामुळे सध्या १२.३६ टक्के असलेला सेवाकरामध्ये किती टक्के वाढ होणार आहे?
१] १४ टक्के
२] १.६४ टक्के
३] २.६४ टक्के
४] १६ टक्के


२] १.६४ टक्के

[प्र.१०] केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत भूसंपादन विधेयकाच्या अध्यादेशाला मंजुरी देण्यात आली. मोदी सरकारने भूसंपादन विधेयकाबाबत काढलेला हा कितवा अध्यादेश आहे?
१] पहिला
२] दुसरा
३] तिसरा
४] चौथा


३] तिसरा

३ टिप्पण्या: