प्रश्नसंच १५८ - चालू घडामोडी

सहाय्यक परीक्षा २०१५ करिता अतिमहत्वाची प्रश्नावली

Current affairs quiz [प्र.१] राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी २-३ जून दरम्यान कोणत्या देशाला भेट दिली?
अ] बेल्जियम
ब] बेलारूस
क] नेपाळ
ड] अफगाणिस्तान


ब] बेलारूस

[प्र.२] महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करणे, नैसर्गिक आपत्तीशी मुकाबला करणे, हरितगृहे याबाबत सहकार्य करणारा द्विपक्षीय करार महाराष्ट्राने कोणत्या देशाबरोबर केला?
अ] स्वीडन
ब] नॉर्वे
क] जर्मनी
ड] नेदरलँड


ड] नेदरलँड

[प्र.३] जून २०१५मध्ये भारत ‘अ’ आणि युवा (१९ वर्षांखालील) संघांच्या प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
अ] रवी शास्त्री
ब] सौरव गांगुली
क] राहुल द्रविड
ड] सुनील गावस्कर


क] राहुल द्रविड

[प्र.४] ७ व ८ जूनला जी-७ देशांची शिखर बैठक कोठे पार पडली?
अ] न्यूयॉर्क (अमेरिका)
ब] पॅरीस (फ्रांस)
क] लंडन (युनायटेड किंग्डम)
ड] बावरिया (जर्मनी)


ड] बावरिया (जर्मनी)

[प्र.५] शहरांच्या गरजेनुसार घनकचरा, कचरा गोळा करण्याचे व्यवस्थापन आणि डंपिंग ग्राउंडची क्षमता कशाप्रकारे वाढविता येईल, याचा शास्त्रोक्त अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्राने कोणत्या देशाबरोबर आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार केला?
अ] नेदरलँड
ब] बेलारूस
क] जर्मनी
ड] बेल्जियम


अ] नेदरलँड

[प्र.६] सार्वजनिक उपक्रम विभागाने भारतीय अक्षय ऊर्जा विकास संस्था समितीला (इरेडा) २ जून २०१५ रोजी कोणता दर्जा प्रदान केला.
अ] नवरत्न
ब] मिनिरत्न
क] महारत्न
ड] यापैकी नाही


ब] मिनिरत्न 
‘मिनीरत्न’ दर्जाचे फायदे : ५०० कोटी रुपयांपर्यंत गुंतवणुकीसाठी सरकारच्या परवानगीची आवश्यकता नाही.

[प्र.७] जून २०१५मध्ये पार पडलेली फ्रेंच ओपन महिला एकेरी स्पर्धा कोणी जिंकली?
अ] ल्युसी साफारोव्हा
ब] मारिया शारापोवा
क] सेरेना विलियम्स
ड] विनस विलियम्स


क] सेरेना विलियम्स 
सेरेना विलियम्सने फ्रेंच ओपन तिसऱ्यांदा जिंकली असून या स्पर्धेत एकेरीचे विजेतेपद पटकावणारी ती सर्वात बुजुर्ग टेनिसपटू ठरली आहे.

[प्र.८] ज्येष्ठ नेते गोविंदराव आदिक यांच्याबद्दल दिलेल्या विधानांमधील चुकीचे विधान ओळखा.
अ] त्यांचे ६ जून रोजी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये निधन झाले.
ब] त्यांनी १९६६ ते १९७० च्या दरम्यान त्यांनी मुंबई न्यायालयात वकीली केली.
क] कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
ड] २००३ ते २००४ या कालावधीत कृषी व विधी खात्याचे मंत्री होते.


क] कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. 
बरोबर विधान : त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून काम पाहिले आहे.

[प्र.९] जून २०१५ मध्ये यूएफा चॅंपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या संघाने मिळविले?
अ] बार्सिलोना क्लब
ब] युव्हेंट्‌स क्लब
क] रियल माद्रिद
ड] चेल्सी


अ] बार्सिलोना क्लब 
बार्सिलोना क्लबचे हे पाचवे यूएफा चॅंपियन्स लीग फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद आहे.

[प्र.१०] समाजसुरक्षा आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल बाहरीन राजवटीने कोणत्या भारतीय व्यक्तीचा 'इसा' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मान केला?
अ] अच्युत पटवर्धन
ब] अच्युत गोडबोले
क] अच्युत सावंत
ड] अच्युत सामंत


ड] अच्युत सामंत

२ टिप्पण्या: