चालू घडामोडी - २७ व २८ नोव्हेंबर २०१५

२८ नोव्हेंबर १८९० : महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी

‘अग्नी-१’ची यशस्वी चाचणी

  AGNI 1
 • भारताने स्वदेशी बनावटीच्या अण्वस्त्रवाहू अग्नी-१ या क्षेपणास्त्राची अब्दुल कलाम आयलंड, बालासोर (ओडिशा) येथे यशस्वी चाचणी घेतली. मोबाईल लॉंचरच्या माध्यमातून क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण करण्यात आले.
 • संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) मधील ऍडव्हान्स्ड सिस्टिम्स लॅबोरेटरीने ते विकसित केले आहे. यासाठी संरक्षण संशोधन विकास प्रयोगशाळा आणि इम्रातमधील संशोधन केंद्र व हैदराबादेतील भारत डायनॅमिक्स लिमिटेड या संस्थांनीही मदत केली होती.
 • या क्षेपणास्त्रामध्ये अत्याधुनिक दिशादर्शक यंत्रणा बसविण्यात आली असून, त्यामुळे या क्षेपणास्त्राला आपल्या लक्ष्याचा अचूक भेद घेणे शक्य होते.
 अग्नी-१ ची वैशिष्ट्ये 
 • प्रकार : जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे 
 • क्षमता : ७०० किलोमीटर
 • इंधन : घनरूपातील इंधनाचा वापर (सिंगल स्टेज क्षेपणास्त्र)
 • वजन : १२ टन
 • लांबी : १५ मीटर
 • अण्वस्त्रे वाहून नेण्याची क्षमता : एक टन

स्वित्झर्लंडमध्ये बुरखाबंदी

 • फ्रान्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेचा उपाय म्हणून स्वित्झर्लंड सरकारने सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यास बंदी घातली आहे.
 • दुकाने, रेस्टॉरंट, सार्वजनिक इमारती व ठिकाणे या ठिकाणी महिलांना बुरखा घालून फिरता येणार नाही. ही बंदी तोडल्यास सुमारे साडेसहा लाख रुपये दंड करण्यात येणार आहे.
 • स्वित्झर्लंडमध्ये सुमारे ४० हजार मुस्लिम महिला आहेत. 
 • फ्रान्समध्ये यापूर्वीच बुरख्यावर बंदी घालण्यात आली आहे.

‘बराक-८’ क्षेपणास्त्राची चाचणी

  Barak 8
 • इस्राईलने भारतासमवेतच्या संयुक्त उपक्रमातून विकसित केलेल्या बराक-८ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. या क्षेपणास्त्राने शत्रू म्हणून एका छोट्या ड्रोनवर हल्ला केला.
 • इस्राईलच्या नौसेनेच्या जहाजावरून सोडण्यात आलेले बराक-८ क्षेपणास्त्राने अचूक लक्ष्य साधले आणि शंभर टक्के यश मिळवले.
 • बराक-८ हे बराक क्षेपणास्त्राचे विकसित रूप मानले जाते. हे क्षेपणास्त्र विमान, ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यात नौसेनेचे संरक्षण करण्यासाठी विकसित करण्यात आले आहे.
 • भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ); तसेच इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीज (आयएआय), इस्रायलचे शस्त्रास्त्रे आणि तंत्रज्ञान विकास व्यवस्थापन, एल्टा सिस्टिम्स आणि इतर कंपन्यांनी संयुक्तपणे बराक-८ हे क्षेपणास्त्र विकसित केले आहे.
 • इस्रायलच्या समुद्रातील तेलसाठ्यांचे संरक्षण करण्यासाठी जमिनीवरून हवेत मारा करणारे हे क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले आहे.
 • 'बराक-८' क्षेपणास्त्र यंत्रणेमधील आधुनिक यंत्रणेमुळे एकाच वेळी वेगवेगळ्या लक्ष्यांचा वेध घेता येणे शक्य होणार आहे. दिवस, रात्र, तसेच वेगवेगळ्या हवामान स्थितीमध्ये हे क्षेपणास्त्र काम करू शकेल.

ओ. पी. शर्मा निलंबित

 • दिल्ली विधानसभेतील आम आदमी पक्षाच्या (आप) आमदार अलका लांबा यांना उद्देशून अशोभनीय भाषेचा वापर केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे (भाजप) आमदार ओ. पी. शर्मा यांना संपूर्ण हिवाळी अधिवेशनाच्या काळासाठी निलंबित करण्यात आले आहे.
 • दिल्ली विधानसभा अध्यक्ष : राम निवास गोयल

'एचएसबीसी' भारतातील व्यवसाय बंद करणार

 • आंतरराष्ट्रीय स्तरावर आघाडीची बँक असलेल्या हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन अर्थात एचएसबीसी बँकेने भारतातील खासगी (वैयक्तिक) बँकिंग व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. 
 • गेल्या काही वर्षात एसएसबीसीने जगभरातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठी कपात करण्यास सुरुवात केली आहे. वर्ष २०१० पासून जगभरातील कर्मचाऱ्यांमध्ये तब्बल दीड लाखांची घट केली आहे.
 • भारतातील व्यवसाय बंद करणारी एचएसबीसी दुसरी परदेशी बॅंक आहे. याआधी दोन महिन्यांपूर्वी रॉयल बँक ऑफ स्कॉटलंडनेसुद्धा (आरबीएस) भारतातील आपला बँकिंग व्यवसाय बंद केला होता.

No comments:

Post a Comment