चालू घडामोडी - ८ डिसेंबर २०१५

सुषमा स्वराज पाकिस्तानच्या दौऱ्यावर

    Sushma Swaraj
  • इस्लामाबादमध्ये ९ डिसेंबरला 'हर्ट ऑफ एशिया' ही अफगाणिस्तानसंदर्भातील मंत्र्यांची पाचवी प्रादेशिक परिषद होणार आहे. या बैठकीला भारतातर्फे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज उपस्थित राहणार आहेत. स्वराज यांच्यासोबत परराष्ट्र सचिव एस. जयशंकर दौऱ्यात असणार आहेत.
  • पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. या परिषदेला विविध देशांचे परराष्ट्र मंत्री उपस्थित राहणार आहेत.
  • यापूर्वी माजी परराष्ट्र मंत्री एस. एम. कृष्णा यांनी २०१२मध्ये इस्लामाबादला भेट दिली होती. 
  • भारत आणि पाकिस्तान या दोन्हीदेशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची बैठक ६ डिसेंबर रोजी बँकॉक येथे झाली होती. त्यानंतर आता स्वराज पाकिस्तानच्या दौऱ्यावर जात आहेत.
  • दहशतवाद, जम्मू आणि काश्मीर तसेच महत्वाच्या द्विपक्षीय विषयांवर या भेटीत चर्चेला येणार आहेत. सुषमा स्वराज पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचीही भेट घेणार आहेत.

आयपीएलमध्ये पुणे आणि राजकोट या नव्या संघांचा समावेश

    IPL
  • इंडियन प्रीमियर लीगमधील चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघांवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आल्यानंतर आता त्या जागी पुणे आणि राजकोट हे दोन नवे संघ समाविष्ट करण्यात आले आहेत.
  • पुणे फ्रँचाइझीचे मालक म्हणून गोएंका यांची न्यू रायझिंग कंपनी असेल तर राजकोटच्या संघाचे हक्क इन्टेक्स मोबाईलने जिंकले आहेत.
  • उलट बोली पद्धतीने (रिव्हर्स बीडिंग) या दोन नव्या संघांची निवड करण्यात आली. त्यानुसार आता गोएंका हे बीसीसीआयला दोन वर्षांच्या या करारात दरवर्षी १६ कोटी देतील तर इन्टेक्स मोबाईल हे १० कोटी देतील.
  • या दोन्ही संघांची निवड रिव्हर्स बीडिंग पद्धतीने झाली. त्यानुसार दोन संघांसाठी ४० कोटी ही मूलभूत रक्कम निश्चित करण्यात आली. जो कमीतकमी बोली लावेल त्याला संघ मिळाल्याचे जाहीर केले गेले.
  • पुढील वर्षी ९ एप्रिल ते २९ मे या कालावधीत आयपीएल खेळविली जाणार आहे.
  • बीसीसीआयचे अध्यक्ष : शशांक मनोहर
  • आयपीएलचे अध्यक्ष : राजीव शुक्ला
  • २०१३मध्ये झालेल्या आयपीएल स्पॉटफिक्सिंग प्रकरणानंतर सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या लोढा आयोगाने चेन्नई आणि राजस्थान या दोन संघांवर दोन वर्षांची बंदी घातली. पण निलंबनाचा अवधी संपल्यानंतर त्यांना पुन्हा आयपीएलमध्ये परतण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे २०१८ला जेव्हा हे दोन संघ परत येतील तेव्हा एकूण १० संघांची आयपीएल खेळवायची की नाही हे बीसीसीआयला ठरवावे लागणार आहे.

आशियात ट्विटरवर सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती अमिताभ बच्चन

  • आशियातील ट्विटरवर सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या १० व्यक्तींमध्ये ८ भारतीय तर २ इंडोनेशियन आहेत.
  • आशियातील सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती अमिताभ बच्चन असून, त्यांचे ट्विटरवर १८.१ दशलक्ष चाहते आहेत. त्यानंतर शाहरूख खानचा क्रमांक लागतो. या दोघांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मागे टाकले आहे.
भारतातील टॉप १० ट्विटर अकाउंटस
व्यक्तीचे नावफॉलोअर्स
अमिताभ बच्चन१८.१ दशलक्ष
शाहरुख खान१६.५ दशलक्ष
नरेंद्र मोदी१६.४ दशलक्ष
आमिर खान१५.५ दशलक्ष
सलमान खान१५ दशलक्ष
दीपिका पदुकोन१२.३ दशलक्ष
ह्रितिक रोशन११.९ दशलक्ष
प्रियंका चोप्रा११.८ दशलक्ष
अक्षय कुमार१०.६ दशलक्ष
१०ए. आर. रेहमान९.५ दशलक्ष

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा