स्टार्ट-अप इंडिया योजना

  Start Up India
 • देशातील तरुणांनी उद्योजक होण्यासाठी प्रवृत्त व्हावे, लघु उद्योगांना प्रोत्साहन मिळावे, त्यातून अधिकाधिक रोजगाराची निर्मिती व्हावी यासाठी आखण्यात आलेल्या ‘उद्यमारंभ भारत’ (स्टार्ट-अप इंडिया) या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेला १६ डिसेंबर रोजी मूर्त रूप आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथे या योजनेचे उद्घाटन केले.
 • यावेळी अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमधील स्टार्टअप कंपन्यांच्या प्रतिनिधींसह देशातील सुमारे १५०० स्टार्टअपचे प्रतिनिधी उपस्थित होते.
 • गेल्या वर्षी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी ‘उद्यमारंभ भारत’ या योजनेची संकल्पना मांडली होती.
 योजनेची ठळक वैशिष्टय़े 
 • स्टार्टअपना आर्थिक मदतीकरिता १०,००० कोटी रुपयांचा निधी.
 • स्टार्टअपना पहिली तीन वर्षे आयकर सवलत.
 • व्हेंचर कॅपिटल गुंतवणूकीला कॅपिटल गेन्स टॅक्स नाही.
 • एकच दिवसात स्टार्टअप सुरू करण्यासाठी पोर्टल आणि मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमाने वाटप प्रक्रिया
 • स्वप्रमाणनची सुविधा, भारताला स्टार्टअप हब बनविणार
 • पेटंट प्रक्रियेचे सुलभीकरण, पेटंट शुल्कात ८० टक्क्यांपर्यत घट
 • दिवाळखोरीत निघाल्यास ९० दिवसांत योजनेतून बाहेर पडण्याचा पर्याय उपलब्ध
 • चार वर्षात दोन हजार कोटी रुपयांचा क्रेडिट गॅरंटी निधी
 • सरकारी खरेदीत स्टार्टअपना सवलत
 • नवविचारांच्या प्रोत्साहनासाठी ‘अटल अविष्कार योजना’
 • ५ लाख शाळांमध्ये १० लाख विद्यार्थ्यांसाठी नवविचार कार्यक्रम

1 टिप्पणी: