चालू घडामोडी : १६ ऑक्टोबर

किगाली दुरुस्ती

 • हवामान बदलास अटकाव करण्यासाठी किगाली (रवांडा) येथे सुरू असलेल्या जागतिक परिषदेत एका महत्वपूर्ण करार १९० देशांच्या सहमतीने मंजूर करण्यात आला.
 • हायड्रोफ्लुरोकार्बन (एचएफसी) या वर्गातील १९ विविध वायूंचे उत्पादन आणि वापर टप्प्याटप्प्याने कमी करून, सन २०५० पर्यंत तो पूर्णपणे बंद करण्याचा हा करार आहे.
 • गेल्या वर्षी झालेल्या पॅरिस करारानंतर हवामान बदलास अटकाव करण्यासाठी झालेला हा दुसरा महत्त्वाचा जागतिक करार आहे.
 • जागतिक तापमानवाढ ओद्योगिक क्रांतीपूर्वीच्या तुलनेत २ अंश सेल्सियसपर्यंत मर्यादित ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवून पॅरिस करार करण्यात आला आहे.
 • ते साध्य करण्यासाठी आताच्या या ‘किगाली दुरुस्ती’चा मोठा हातभार लागू शकेल.
 • पॅरिस करारास ७३ हून अधिक देशांची मान्यता दिल्याने तो येत्या ४ नोव्हेंबरपासून बंधनकारक होणार आहे.
 • हा नवा करार ‘किगाली दुरुस्ती’ (किगाली अमेंडमेंट) म्हणून ओळखला जाणार आहे.
 • हवामान बदलाविषयीची पुढील जागतिक शिखर परिषद ७ नोव्हेंबरपासून मोरोक्कोत मर्राकेश येथे सुरू होणार आहे.
 किगाली दुरुस्ती 
 • किगाली दुरुस्तीनुसार सन २०५०पर्यंत सर्व ‘एचएफसी’ वायूंचे खरेच उच्चाटन शक्य झाले, तर त्याने या शतकाच्या अखेरपर्यंत संभाव्य जागतिक तापमानवाढ ०.५ अंश सेल्सियसने रोखणे शक्य होईल.
 • यामुळे सन २०२० ते २०५० या काळात ७० अब्ज टन कार्बन डायॉक्साइडएवढे हवेचे प्रदूषण रोखले जाईल.
 • दुसऱ्या परिमाणात सांगायचे तर प्रत्येकी ५०० मेवॉ क्षमतेचे कोळशावर चालणारे औष्णिक विद्युत प्रकल्प बंद केल्याने किंवा पाच कोटी मोटारी रस्त्यांवरून काढून घेतल्याने जे साध्य होईल ते यामुळे होईल.
 हायड्रोफ्लुरोकार्बन (एचएफसी) 
 • पृथ्वीच्या वातावरणातील ओझोन वायूचे आवरण प्रखर सूर्यकिरणांमधील अत्यंत घातक अशी अतिनील (अल्ट्रा व्हायोलेट) किरणे बऱ्याच प्रमाणत शोषून घेते.
 • त्यामुळे पृथ्वीवरील सजीवसृष्टीचे या अतिनील किरणांच्या दाहकतेपासून रक्षण होते.
 • वाढते प्रदूषण व औद्योगिक उत्सर्जनामुळे हवेत सोडल्या जाणाऱ्या विषारी वायुंमुळे ओझोनच्या आवरणास काही ठिकाणी मोठी भोके पडली आहेत.
 • यामुळे अतिनील किरणे पृथ्वीपर्यंत पोहोचून सजीवसृष्टीस धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
 • या विषारी वायूंच्या उत्सर्जनास आळा घालण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाच्या प्रयत्नांनी १९८९मध्ये कॅनडातील मॉन्ट्रियल शहरात एक करार झाला होता.
 • तो ‘मॉन्ट्रियल प्रोटोकॉल’ म्हणून ओळखला जातो. यात ‘एचएफसी’ वर्गातील वायुंचा समावेश नव्हता.
 • एअर-कंडिशनिंग आणि रेफ्रिजरेशन उद्योगांमध्ये हायड्रोफ्लुरोकार्बन (एचएफसी) वायू मोठ्या प्रमाणावर वापरले जातात. 
 • हे वायू स्वत: ओझोन आवरणास हानिकारक नसले तरी ‘ग्लोबल वॉर्मिंग’च्या दृष्टीने ते कार्बन डायऑक्साईडहून हजारपटीने अधिक हानीकरक आहेत.
 • त्यामुळे इतर वायुंसोबत ‘एचएफसी’ वायुंचा समावेश ‘मॉन्ट्रियल प्रोटोकॉल’मध्ये करण्यासाठी किगालीमध्ये हा नवा करार झाला आहे.

अरुणाचलमध्ये भाजप सत्तेत

 • भारतीय जनता पक्षाने पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलसोबत (पीपीए) हातमिळवणी करत अधिकृकरीत्या अरुणाचलच्या सत्तेत प्रवेश केला.
 • भाजपचे ज्येष्ठ आमदार तमियो टागा यांनी पेमा खांडू सरकारच्या मंत्रिमंडळात प्रवेश करत मंत्रिपदाची शपथ घेतली.
 • राज्यपाल व्ही, षन्मुखानाथन यांनी टागा यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यामुळे आता अरुणाचल हे भाजप सत्तेत असलेले १४ वे राज्य ठरले आहे.
 • टागा यांना समाविष्ट करण्यासाठी खांडूंना उद्योग, वस्त्रोद्योग आणि हस्तकला आणि सहकारमंत्री तपंग तलोह यांना मंत्रिमंडळातून वगळावे लागले.
 • राज्याच्या ६० सदस्यांच्या या विधानसभेत काँग्रेसचे ४४ आमदार होते. मात्र खांडू यांनी ४३ आमदारांसह काँग्रेसमधून बाहेर पडत पीपीएमध्ये प्रवेश केला.
 • १६ जुलैला त्यांनी नबाम तुकी यांची जागा घेत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.
 • अरुणाचल विधानसभेत आता पीपीएचे ४४, भाजपचे ११, काँग्रेसचे ३ आणि २ अपक्ष सदस्य आहेत.

पाकिस्तानी कलाकार असलेले सिनेमे अडचणीत

 • पाकिस्तानी कलाकार असलेले एकही सिनेमे दाखवणार नाही, असा निर्णय सिनेमा ओनर्स असोसिएशनच्या बैठकीत हा घेण्यात आला आहे.
 • या पार्श्वभूमीवर एक्झिबिटर्स असोसिएशनने सर्व सदस्यांना करण जोहरचा ‘ए दिल है मुश्किल’ सिनेमा प्रदर्शित न करण्यासंदर्भातील सूचनाही दिली आहे.
 • ‘ए दिल है मुश्किल’मध्ये पाकिस्तानी कलाकार फवाद खान असल्याने हा सिनेमा अडचणीत आला आहे.
 • मुंबईसह महाराष्ट्र, गोवा, गुजरात आणि कर्नाटकातील काही भागांमध्ये हा निर्णय लागू करण्यात आला आहे.
 • उरी येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २० भारतीय जवान शहीद झाले. यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध ताणले गेले आहेत.
 • पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया थांबत नसल्याने भारताने पाकिस्तानची सर्व बाजूंनी कोंडी करण्याचा निर्णय घेतला आहे.
 • याचाच एक भाग म्हणून 'इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन'ने (इम्पा) भारतात पाकिस्तानी कलाकारांच्या काम करण्यावर बंदी घातली. 
 • या निर्णयाच्या एक पाऊल पुढे जात, सिनेमा ओनर्स असोसिएशनने पाकिस्तानी कलाकार असलेले सिनेमे न दाखवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
 • सिनेमा ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष : नितीन दातार

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा