प्रश्नसंच ११६ - [सामान्य अध्ययन]

[प्र.१] भारतीय निर्वाचन (निवडणूक )आयोगाची स्थापना कधी झाली?
१] २६ जानेवारी १९५०
२] २५ जानेवारी १९५०
३] १ जानेवारी १९५०
४] १ एप्रिल १९५०

उत्तर
२] २५ जानेवारी १९५०
------------------
[प्र.२] विश्वकोश या प्रसिद्ध मराठी ज्ञानकोषाचे संपादन प्रामुख्याने कोणी केले?
१] पां.वा.काणे
२] लक्ष्मणशास्त्री जोशी
३]बाबासाहेब आंबेडकर
४] विजया लाड

उत्तर
२] लक्ष्मणशास्त्री जोशी
------------------
[प्र.३] राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 'ई -दिशा ' हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रथम सुरु करण्यात आला?
१] लातूर
२] नांदेड
३] चंद्रपूर
४] नंदुरबार
 
उत्तर
३] चंद्रपूर
------------------
[प्र.४] पहिल्या विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने कोणाला गौरविण्यात आले ?
१] गौतम राजाध्यक्ष
२] डॉ.विजया राजाध्यक्ष
३] डॉ.रा.चिं.ढेरे
४] विजया वाड

उत्तर
२] डॉ.विजया राजाध्यक्ष
------------------
[प्र.५] देशातील पहिले वैश्विक आण्विक ऊर्जा केंद्र कोठे उभारले जात आहे ?
१] बहादूरगड
२] कल्पक्कम
३] मुंबई
४] दार्जीलिंग

उत्तर
१] बहादूरगड
------------------
[प्र.६] कोणत्या कायद्याने ग्राम-न्यायालयांची स्थापना झाली?
१] ग्राम-न्यायालय कायदा २००९
२] ग्राम-न्यायालय कायदा २००८
३] ग्राम-न्यायालय कायदा २०१०
४] भारतीय न्यायालय कायदा १९४९

उत्तर
२] ग्राम-न्यायालय कायदा २००८
{हा कायदा २ ऑक्टोबर २००९ साली लागू झाला}

------------------
[प्र.७] 2011 चे रेमन मॅगसेसे पारितोषिक विजेते हरीश हांडे यांनी कोणत्या कंपनीद्वारे गरीबांना अतिशय कमी खर्चात व परवडणार्या दरात सौरऊर्जेचे तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले ?
१] नाल्को
२] सेल्को
३] सेल
४] ग्रीन एनर्जी

उत्तर
२] सेल्को (Solar Energy Light Company)
------------------
[प्र.८] भारतीय राष्ट्रवादाच्या उदयास कारणीभूत ठरलेली संथाल चळवळ कशाशी संबंधित आहे?
१] आदिवासींच्या जमीन लागवडीशी
२] आदिवासींच्या शिक्षणाशी
३] आदिवासींच्या पुरातन सामाजिक रूढीशी
४] आदिवासींच्या राजकीय गटांशी
 
उत्तर
१] आदिवासींच्या जमीन लागवडीशी
------------------
[प्र.९] महात्मा फुलेंनी लिहिलेल्या 'तृतीय रत्न' या नाटकाची मध्यवर्ती कल्पना कशावर आधारित होती?
१] शेतकऱ्यांवर
२] अस्पृश्यांवर
३] ब्राम्हणी मुर्तिपूजेवर
४] स्त्री दास्यावर
 
उत्तर
३] ब्राम्हणी मुर्तिपूजेवर
------------------
[प्र.१०] इला भट्ट ह्या कोणत्या गैर-सरकारी संस्था(NGO)च्या संस्थापक आहेत ?
१] सेवा
२] तरुण भारत संघ
३] परिवर्तन
४] नवज्योती
 
उत्तर
१] सेवा (SEWA: Self Employed Women's Association)
------------------