चालू घडामोडी - २० मे २०१५


रेल्वे मंत्रालयाद्वारे कौशल्य प्रशिक्षण योजना
  • रेल्वे मंत्रालयाद्वारे १ जून २०१५पासून देशातील ठराविक रेल्वेचे डब्बे बनविणाऱ्या कार्यशाळा आणि कारखाने यामध्ये कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल.
  • हा कार्यक्रम कौशल्य भारत मिशनचा भाग असेल ज्याअंतर्गत रेल्वे कार्यशाळा आणि स्थानिक कारखाने यामध्ये स्थानिक युवकांना तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
  • या मिशन अंतर्गत प्रत्येक युनिटमधील किमान १०० तरुणांना प्रशिक्षण देण्यात येईल. हे प्रशिक्षण तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांद्वारे स्थानिक युवकांना देण्यात येणार आहे.
  • याठिकाणी मिळणार कौशल्य प्रशिक्षण :
    • चित्तरंजन लोकोमोटिव कार्यशाळा - कोलकाता
    • डिझेल लोकोमोटिव कार्यशाळा - वाराणसी
    • डिझेल लोकोमोटिव आधुनिकीकरण कारखाना - पटियाळा
    • रेल्वे कोच फॅक्टरी - कपुरथळा
    • कोच फॅक्टरी - पेराम्बुर
    • रेल्वे व्हील फॅक्टरी - बंगळूरू
    • रेल्वे विद्युतीकरण केंद्रीय सहकार संघटना - अलाहाबाद

एलिस आईसलँड पदकाने भारतीय अमेरिकन सन्मानित
  • सहा भारतीय अमेरिकन आणि एक ब्रिटिश भारतीय यांना १९ मे २०१५ रोजी ह्युस्टन येथे २०१५चे प्रतिष्ठित ‘एलिस आईसलँड पदक’ प्रदान करण्यात आले. यांच्यासह एकूण १०० व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • एलिस आईसलँड पदक अमेरिकन विकासात योगदान देणाऱ्या स्थलांतरितांना दिले जाते.
  • भारतीय-अमेरिकन विजेत्यांमध्ये खालील लोकांचा समावेश आहे.
  • मीरा गांधी - मीरा गांधी ‘द गिविंग बॅक फाउंडेशन’च्या संस्थापक आहेत. द गिविंग बॅक फाउंडेशनने जगातील स्त्रिया, मुले, शिक्षण यांच्या विकासात तसेच गरिबी आणि रोगराई समस्यांविरुद्ध लढाईमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
  • चाड पी गेहानी - गेहानी न्यूयॉर्कच्या स्टेट डेंटल संघटनेचे माजी अध्यक्ष आहेत. 
  • राहुल जिंदाल - सध्या ते वॉल्टर रीड राष्ट्रीय सैन्य मेडिकल सेंटरमध्ये सर्जन आहेट. २०१३ मध्ये त्यांना आंतरराष्ट्रीय नेतृत्व फाउंडेशनचा नेतृत्व पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
  • मोना सिन्हा - मोना सिन्हा स्त्री-शिक्षणकरीता काम करणाऱ्या आशियाई महिला नेतृत्व विद्यापीठाच्या एक संस्थापक सदस्य आहेट.
  • के. व्ही. कुमार - के. व्ही. कुमार व्यवस्थापन कन्सल्टन्सी कंपनी कुमार आणि तलवाडकर असोसिएटसचे व्यवस्थापकीय भागीदार आहेत.
  • बरोनेस संदीप वर्मा - ते युनायटेड किंगडमच्या हाउस ऑफ लॉर्डसचे सदस्य आहेत. याच्या व्यतिरीक्त ते इंग्लंडच्या उर्जा आणि हवामान परिवर्तन विभागचे माजी कनिष्ठ मंत्री आहेत.

इन्फोसिसची २०१८पर्यंत कार्बन न्यूट्रल होण्याची घोषणा
  • भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी इन्फोसिसने २०१८पर्यंत कार्बन न्यूट्रल होण्याची घोषणा केली. यासाठी सुमारे ४०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.
  • इन्फोसिस २०१५ मध्ये ग्रामीण क्षेत्रातील विद्युतीकरण, बायोगॅस संयंत्रे आणि धूरविरहित स्टोव्ह वितरण करण्यासाठी जवळपास ७० कोटी खर्च करणार आहे.
  • शाश्वत विकासाच्या उद्देशाने इन्फोसिस कर्नाटकमध्ये ४० मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प सुरु करणार आहे. सध्या इन्फोसिस भारतातील आपल्या सर्व संकुल छतावर २.७ मेगावॅटचे सौर पॅनेल वापरत आहे.
  • वर्ष २०१४-१५ मध्ये इन्फोसिसने जागतिक स्तरावर २५७ लक्ष युनिट विजेचा वापर केला आहे त्यापैकी  ३० टक्के वापर अक्षय उर्जेचा आहे.
  • २०११ मध्ये इन्फोसिसने संयुक्त राष्ट्रसंघात २०१८पर्यंत कार्बन न्यूट्रल होण्याचे जाहीर केले होते. त्याच बरोबर सर्व ऊर्जा गरजांच्या पूर्ततेसाठी अक्षय ऊर्जा स्त्रोत वापरण्याची तसेच पाणी वापर आणि दरडोई वीज वापर निम्म्यापर्यंत कमी करण्याची घोषणा करण्यात आली होती.
  • २०१४-१५ वर्षात कंपनीचा दरडोई वीज आणि पाणी वापर अनुक्रमे ४५ टक्के आणि ३५ टक्के आहे.

कुलदीप मलिक भारतीय कुस्ती संघाचे राष्ट्रीय प्रशिक्षक
  • भारतीय कुस्ती महासंघाने १८ मे २०१५ रोजी कुलदीप मलिक यांना भारतीय कुस्ती संघाचे राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात केले. विनोद कुमार यांच्या जागी मलिक यांना नियुक्त करण्यात आले.
  • द्रोणाचार्य पुरस्कार विजेते मलिक आतापर्यंत महिला फ्रीस्टाइल संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. आता ते पुरुष फ्रीस्टाइल संघाची जबाबदारी देखील पार पाडतील.
  • याशिवाय माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू आर्य कृष्णा यांची महिला संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
  • कुस्तीगीर नरसिंग यादव आणि संदीप यांचे वैयक्तिक प्रशिक्षक जगमल सिंग यांची पुरुष फ्रीस्टाइल संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली.
  • मे २०१५ मध्ये दोहा येथे झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भारताची कामगिरी निराशाजनक झाली होती. 

पाक-अफगाणिस्तानात गुप्तवार्ता करार
  • तालिबानी दहशतवाद्यांशी लढण्यासाठी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. 
  • पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स (आयएसआय) आणि अफगाणिस्तानातील गुप्तचर संस्था असलेल्या राष्ट्रीय सुरक्षा संचालनालयाने (एनडीएस) गुप्तवार्तांची देवाण-घेवाण करण्याबाबतच्या कराराला मंजुरी दिली. 
  • या भागातील तालिबानचे वर्चस्व पाहता या कराराला महत्त्व प्राप्त झाले आहे.

‘इंटरनेट डॉट ओआरजी’ला जगभरातून विरोध
    Internet dot org
  • फेसबुकचा महत्वाकांक्षी प्रकल्प ‘इंटरनेट डॉट ओआरजी’ला जगभरातून विरोध होत आहे. फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांना जगातील ३१ देशांमधील ६५ संघटनांनी याबाबतचा विरोध दर्शविणारे खुले पत्र लिहिले आहे.
  • अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संधीची समानता, सुरक्षा, गोपनियता आणि नावीन्यपूर्णता यांना या प्रकल्पामुळे धोका असल्याचे पत्रात म्हटले आहे. 
  • या प्रकल्पाद्वारे विनामूल्य इंटरनेट पुरविण्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात इंटरनेटवरील अतिसुक्ष्म भागच या प्रकल्पाद्वारे उपलब्ध होत असल्याचे पत्रात म्हटले आहे. तसेच या प्रकल्पाद्वारे विशिष्ट सेवाच विनामूल्य पुरविल्या जात असल्याने ‘नेट न्युट्रॅलिटी‘चा भंग होत असल्याचेही म्हटले आहे.
  • काय आहे ‘इंटरनेट डॉट ओआरजी’? 
  • जगभरातील विकसनशील देशातील नागरिकांना निवडक इंटरनेट सेवा विनामूल्य उपलब्ध होण्यासाठी फेसबुकचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. 
  • फेसबुकने या प्रकल्पासाठी जगभरातील सात मोबाईल कंपन्यांशी भागीदारी केली आहे. त्यामध्ये सॅमसंग, इरिक्‍शन, मिडियाटेक, मायक्रोसॉफ्ट, ओपेरा सॉफ्टवेअर, रिलायन्स आणि क्वालकोम यांचा समावेश आहे. या प्रकल्पाचा उद्देश हा केवळ भारतातील गरीब नागरिकांपर्यंत फेसबुक पोचविण्याचा असल्याची टीका भारतातून करण्यात येत आहे.
  • ‘नेट न्युट्रॅलिटी’च्या मुद्यावर अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने ए.के.भार्गव यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय समिती स्थापन केली आहे.

सुधा शिवपुरी यांचे निधन
    Sudha Shivpuri
  • ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेतील ‘बा’ची भूमिका साकारणाऱ्या सुधा शिवपुरी (वय ७७) यांचे निधन झाले.
  • एकता कपूर दिग्दर्शित या मालिकेत सुधा शिवपुरी यांची स्मृती इराणी यांच्यासह प्रमुख भूमिका होती. सुधा या २०१३ पासून आजारी होत्या. गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.
  • सुधा यांनी १९७७ मध्ये बासू चॅटर्जी यांच्या स्वामी या चित्रपटातून पदार्पण केले होते. त्यांनी ‘इंसाफ का तराजू’, ‘हमारी बहू अलका’, ‘बर्निंग ट्रेन’, ‘विधाता’ आणि ‘माया मेमसाब’ या चित्रपटातही काम केले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा