चालू घडामोडी : ४ सप्टेंबर

आपचे माजी आमदार संदीप कुमार यांना अटक

  • सेक्स सीडी प्रकरणात अडकल्यामुळे मंत्रिपद गमावलेले व आम आदमी पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेले आमदार संदीप कुमार यांना अटक करण्यात आली आहे.
  • सेक्स सीडीमध्ये संदीप कुमार यांच्यासोबत दिसलेल्या महिलेने संदीप कुमार यांची सुलतानपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता.
  • या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून पोलिसांनी संदीप कुमार यांना ताब्यात घेतले.
  • पोलिसांनी संदीप कुमार यांच्यावर बलात्कार, विष प्यायला देणे, सार्वजनिक मानहानी तसेच भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल केले आहेत.

भारतीय वंशाचे ब्रिटन संसद सदस्य किथ वाझ यांचा राजीनामा

  • कथित ‘गे सेक्स स्कँडल’ प्रकरणामुळे ब्रिटनमधील भारतीय वंशाचे संसद सदस्य किथ वाझ यांनी संसदेच्या उपसमितीचा राजीनामा दिला आहे.
  • ५९ वर्षीय वाझ यांनी किमान ८ दिवसांपूर्वी पूर्व युरोपातील दोन पुरुष सेक्स वर्कर्सची भेट घेतली होती, असा दावा 'संडे मिरर'ने केला आहे.
  • मिररच्या वृत्तानंतर वाझ यांनी ब्रिटनच्या संसदेच्या होम अफेअर्स सिलेक्शन कमिटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
  • गेल्या दहा वर्षापासून ते या कमिटीवर होते. राजीनामा देताना वाझ यांनी पत्नी आणि मुलांसह आपल्या समर्थकांची माफी मागितली आहे.
 किथ वाझ यांच्याबद्दल 
  • किथ वाझ हे लिसेस्टर इस्टमधून संसदेवर निवडून आलेत. १९८७पासून ते ब्रिटनच्या संसदेचे सदस्य आहेत.
  • ब्रिटनच्या संसदेत सर्वाधिक काळ प्रतिनिधित्व करणारे आशियाई वंशाचे ते पहिले संसद सदस्य आहेत.
  • १९८२मध्ये ते लेबर पार्टीत गेले. जॉन डेनहम यांच्यानंतर २००७मध्ये किथ यांची होम अफेअर्स कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाली होती.
  • अंमली पदार्थ धोरण, इमिग्रेशन आणि गुन्हे अशां बाबींवर या कमिटीची देखरेख होती.
  • भारताबद्दल वाझ यांना प्रचंड सहानुभूती आहे. त्यांनी व्हिसासह अनेक मुद्द्यांबद्दल भारताची बाजू ब्रिटनमध्ये मांडली आहे.

जमात-इ-इस्लामीचा नेता मीर कासीम अली याला फाशी

  • जमात-इ-इस्लामी या मूलतत्त्ववादी पक्षाचा नेता मीर कासीम अली याला ढाका येथे फाशी देण्यात आली.
  • १९७१मधील बांगलादेश मुक्तिसंग्रामावेळी करण्यात आलेल्या मानवतेविरोधातील गुन्ह्यांच्या आरोपांतर्गत अलीला फाशीची शिक्षा सुनाविण्यात आली होती.
  • सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनाविल्यानंतर राष्ट्रपतींनीही त्याची दया याचिका फेटाळली होती. 
  • जमात-इ-इस्लामी या पक्षासाठी आर्थिक पाठबळ जमविणाऱ्या मुख्य नेत्यांमध्ये अलींचा समावेश होता.
  • यापूर्वी या पक्षाचा प्रमुख निझामी याच्या दोन निकटवर्तीयांचा अशा स्वरुपाच्या दयेचा अर्ज बांगलादेशचे राष्ट्रपती अब्दुल हमीद यांनी फेटाळून लावला असून त्यांना गेल्या वर्षी (२०१५) मृत्युदंड देण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment