चालू घडामोडी : ३० नोव्हेंबर

वेटलिफ्टिंगमध्ये चानूला विश्वविक्रमी सुवर्णपदक

  • अमेरिकेतील अनाहिममध्ये आयोजित जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताची महिला वेटलिफ्टर साईखोम मिराबाई चानूने विश्वविक्रमाची नोंद करत सुवर्ण पदकाची कमाई केली.
  • ४८ किलो वजनी गटात स्नॅचमध्ये ८५ किलो आणि जर्कमध्ये १०९ किलो असे एकूण १९४ किलो वजन उचलत तिने हा विश्वविक्रम केला.
  • यापूर्वी फक्त कर्णम मलेश्वरीने १९९४ आणि १९९५ मध्ये जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी सुवर्ण पदकाची कमाई केली होती. मल्लेश्वरीने सिडनी ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये कांस्यपदकही मिळवले होते.
  • २२ वर्षानंतर वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई करणारी मिराबाई चानू ही दुसरी भारतीय महिला ठरली आहे.
  • या स्पर्धेत थायलंडच्या सुकचारोन तुनियाने रौप्य आणि सेगुराने इरिसने कांस्यपदक पटकावले.
  • डोपिंगच्या प्रकरणामुळे रशिया, चीन, कझाकस्तान, युक्रेन आणि अझरबैजान या देशाचे वेटलिफ्टर्स स्पर्धेत सहभागी झाले नव्हते. 
  • मीराबाईचा जन्म ८ ऑगस्ट १९९४ रोजी पूर्व इम्फाळ येथे साईखोम कुटुंबात झाला. वेटलिफ्टिंग खेळाची प्रेरणा तिने मणिपूरची वेटलिफ्टिंगपटू कुंजराणी देवीकडून घेतली.
  • २०१४मध्ये ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करणाऱ्या मीराने ४८ किलो वजनी गटात एकूण १७० किलो वजन उचलले होते. 
  • चानू २०१५च्या जागतिक स्पर्धेत नवव्या, तर २०१४च्या स्पर्धेत अकराव्या स्थानावर राहिली होती.
  • सप्टेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेत चानूने सुवर्णपदक मिळवले होते. त्यामुळे पुढील वर्षीच्या राष्ट्रकुल स्पर्धेत ती पात्र ठरली आहे.

महाराष्ट्र देशातील सर्वात भ्रष्ट राज्य

  • राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाकडून (एनसीआरबी) प्रसिध्द करण्यात आलेल्या एका अहवालानुसार, महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशातील सर्वात भ्रष्ट राज्य ठरले आहे.
  • या अहवालानुसार, २०१६मध्ये देशातील एकूण भ्रष्टाचाराच्या घटनांपैकी २२.९ टक्के (१,०१६) घटना या एकट्या महाराष्ट्रात समोर आल्या आहेत.
  • २०१६मध्ये महाराष्ट्रात भ्रष्टाचाराच्या १,२७९ तर २०१४मध्ये १,३१६ घटना समोर आल्या होत्या. त्या तुलनेत २०१६मध्ये आकडेवारी (१,०१६) कमी झाल्याचे दिसत आहे.
  • या यादीत महाराष्ट्राखालोखाल ओडिसाचा क्रमांक लागतो. ओडिसामध्ये भ्रष्टाचाराच्या ५६९ घटना समोर आल्या आहेत.
  • त्यानंतर केरळमध्ये ४३०, मध्य प्रदेशमध्ये ४०२, आणि राजस्थानमध्ये ३८७ प्रकरणे समोर आली आहेत.
 गुन्हेगारीत उत्तर प्रदेश आघाडीवर 
  • तसेच या अहवालानुसार, २०१६मध्ये देशातील सर्वाधिक जास्त हत्यांची नोंद उत्तर प्रदेशात झाली आहे.
  • उत्तर प्रदेशात गेल्या वर्षी खूनाच्या सर्वाधिक ४,८८९ घटना घडल्या आहेत. त्या खालोखाल बिहारचा नंबर आहे, येथे २,५८१ खून पडले.
  • २०१६मधील देशातील एकूण गुन्ह्यांची संख्या ४८,३१,५१५ आहे. २०१५मध्ये ही संख्या ४७,१०,६७६ इतकी होती. म्हणजे गुन्ह्यांमध्ये २.६ टक्क्यांनी वाढ झाली. 
  • सर्वाधिक हत्यांसह देशातील सर्वात जास्त गुन्ह्यांची नोंदही उत्तर प्रदेशातच झाली आहे. त्यापाठोपाठ मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि केरळचा क्रमांक लागतो.
  • उत्तर प्रदेशात सर्वाधिक गुन्हे नोंदविले असले तरी गुन्ह्यांचे प्रमाण (प्रति एक लाख लोकसंख्या) देशात सर्वाधिक कमी म्हणजे १२८ इतके आहे. देशाची एकूण सरासरी २३३ आहे.
  • महाराष्ट्रात गुन्ह्यांची संख्या २०१५मधील ४ लाख २३ हजारांवरून २०१६मध्ये ४ लाख ३० हजारांवर गेली आहे. महाराष्ट्रातील गुन्ह्यांचे प्रमाण देशाच्या सरासरीपेक्षा कमी म्हणजे २१७ इतके आहे.
  • देशातील गुन्ह्यांचा वेध घेणारा हा सर्वकष वार्षिक अहवाल १९५३पासून नियमितपणे प्रसिद्ध केला जातो.
  • महिलांवरील अत्याचारांच्या आणि दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली नोंदविलेल्या गुन्ह्यांच्या संख्येतही किंचित वाढ झाल्याचे अहवाल सांगतो.
 अहवालातील इतर ठळक मुद्दे 
  • फौजदारी गुन्ह्यांपैकी ७२.९ गुन्ह्यांमध्ये २०१६मध्ये आरोपपत्र दाखल केले, तर गुन्हे सिद्धतेचे प्रमाण ४६.८ टक्के इतके आहे.
  • खुनाच्या घटना कमी झाल्या. २०१५मध्ये ३२,१२७ जणांचे खून झाले होते, २०१६मध्ये ३०,४५० इतक्या घटना घडल्या.
  • दंगलींच्याही घटना कमी झाल्या. २०१५मधील ६५,२५५ घटनांची संख्या २०१६मध्ये ६१,९७४ वर आली.
  • २०१६मध्ये एकूण ३७ लाख ३७ हजार जणांना अटक करण्यात आली. ७ लाख ९४ हजार दोषी ठरविण्यात आले.
  • २०१६मध्ये ५,४९,००० जण बेपत्ता झाले. त्यात सर्वाधिक महाराष्ट्रातून (९४,९१९) होते. पण त्यापैकी २,२९,३८१ जणांना शोधण्यात यश आले.
  • १ लाख ११ हजारांहून अधिक बालके बेपत्ता झाली. त्याचे सर्वाधिक प्रमाण पश्चिम बंगालमध्ये (१६,८८१) आहे.

बौद्ध भिक्खू प्रज्ञानंद यांचे निधन

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धम्माची दीक्षा देणारे बौद्ध भिक्खू प्रज्ञानंद यांचे ३० नोव्हेंबर रोजी वयाच्या ९०व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
  • राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर आपल्या लाखो अनुयायांसह हिंदू धर्म त्यागून बौद्ध धर्मात प्रवेश केला होता.
  • महास्थवीर चंद्रमणी यांच्या नेतृत्वात इतर सात भिक्खूंनी डॉ. आंबेडकरांना अशोक विजयादशमीच्या दिवशी बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती. यात भिक्खू प्रज्ञानंद यांचा समावेश होता.
  • बौद्ध भिक्खू प्रज्ञानंद यांचा जन्म १८ डिसेंबर १९२८ रोजी श्रीलंकेत झाला होता. १९४२मध्ये वयाच्या १३व्या वर्षी ते भारतात आले.
  • प्रज्ञानंद लखनऊच्या रिसालदार पार्कमधील बुद्ध विहारात राहत होते. बाबासाहेबांनी या बुद्ध विहाराला दोन वेळा भेट दिली होती. या बुद्ध विहाराची व्यवस्था पाहणारे सर्वात वरिष्ठ भदन्ते होते.
  • त्यांनी लखनऊतील भारतीय बौद्ध समिती, श्रावस्ती बुद्ध विहार, भारतीय बौद्ध शिक्षण परिषद यांचे अध्यक्षपद तर रिसालदार पार्क बुद्धविहाराचे आजीवन अध्यक्षपद भूषवले होते.

दक्षिण किनारपट्टीवर ओखी चक्रीवादळ

  • भारताच्या दक्षिण किनारपट्टीला ओखी या चक्रीवादळाचा तडाखा बसला असून या वादळात तामिळनाडू आणि केरळमध्ये एकूण ९ जणांना जीव गमवावा लागला आहे.
  • पुढील २४ तासांत ओखी चक्रीवादळ लक्षद्वीपच्या दिशेने सरकणार आहे. या पार्श्वभूमीवर केरळ, तामिळनाडू आणि लक्षद्वीप बेटावर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
  • बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचे रुपांतर या चक्रीवादळात झाले आहे. बांगलादेशने या वादळाला ‘ओखी’ असे नाव दिले आहे.
  • या चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे सध्या ७० ते ८० किमी प्रति तास या वेगाने वारे वाहत असून वाऱ्याचा वेग १०० किमी प्रति तास इतका वाढण्याची शक्यता आहे.

चालू घडामोडी : २९ नोव्हेंबर

मधुकर नेराळे यांना जीवन गौरव पुरस्कार

  • राज्य सरकारतर्फे देण्यात येणारा तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार मधुकर पांडुरंग नेराळे यांना जाहीर करण्यात आला आहे.
  • तमाशा क्षेत्रात प्रदीर्घ योगदान देणाऱ्या ज्येष्ठ कलाकाराला या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. पाच लाख रूपये रोख, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • मधुकर पांडुरंग नेराळे यांचे वडिलोपार्जित तमाशा थिएटर आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासून तमाशासोबत नेराळे यांची नाळ आपोआप जोडली गेली.
  • मधुकर नेराळेंनी सुरूवातीच्या काळात पंडित राजारामजी शुक्ला यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे गिरवले. 
  • त्यांचे वडिलोपार्जित तमाशा थिएटर १९६५ पासून १९९४पर्यंत होते. १९६९साली स्वत:चे जसराज थिएटर स्थापन केले.
  • या संस्थेमार्फत त्यांनी गाढवाचं लग्न, आतून किर्तन वरुन तमाशा, राजकारण गेलं चुलीत, उदे गं अंबे उदे, एक नार चार बेजार, पुनवेची रात्र, काजळी यासारख्या वगनाटयांचे सादरीकरण करून भूमिका केल्या.
  • त्यांनी मुंबई महाराष्ट्र, गोवा व दिल्ली येथे लोककलेचे व लावणीचे यशस्वी कला प्रदर्शन केले.
  • मधुकर नेराळे आणि मंडळी या कलापथकांने अनेक आकाशवाणी केंद्रावर व प्रत्यक्ष रंगमंचावर त्यांनी कार्यक्रम सादर केले.
  • १९९५-९६ साली संगीत नाटक अकादमीतर्फे हिमाचल प्रदेशात त्यांनी लोककलेचे कार्यक्रम सादर केले.
  • १९९० ते १९९६ पर्यंत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या तमाशा प्रशिक्षण शिबिराचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
  • मुंबई लक्षद्विप दैनिक परिवार तर्फे समाज भूषण पुरस्कार, दुरदर्शन मुंबई तर्फे कलारत्न पुरस्कार इत्यादी पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.
  • त्यांच्या तमाशा क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यासाठी त्यांना सरकारने जीवन गौरव पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे.

उत्तर कोरियाकडून पुन्हा क्षेपणास्त्र चाचणी

  • अमेरिकेच्या इशाऱ्यानंतरही उत्तर कोरियाकडून पुन्हा २९ नोव्हेंबर रोजी बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली आहे. हे क्षेपणास्त्र जपानच्या विशिष्ट आर्थिक क्षेत्रात जाऊन पडले.
  • या क्षेपणास्त्राची मारक क्षमता लक्षात घेतल्यास वॉशिंग्टन आणि अमेरिकेचा पूर्वेकडील किनारा उत्तर कोरियाच्या टप्प्यात येतो.
  • उत्तर कोरियाच्या या क्षेपणास्त्र चाचणीचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि संरक्षण मंत्री जिम मॅटिस यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध केला आहे.
  • याआधी १५ सप्टेंबरला उत्तर कोरियाने शेवटची क्षेपणास्त्र चाचणी केली होती. यानंतर दोन महिने या भागात शांतता निर्माण झाली होती. मात्र उत्तर कोरियाने पुन्हा क्षेपणास्त्र डागल्याने पुन्हा एकदा अशांततेचे वातावरण पसरले आहे.
  • जगातील कोणत्याही भागाला लक्ष्य करु शकणाऱ्या अत्याधुनिक क्षेपणास्त्रांची निर्मिती सध्या उत्तर कोरियाकडून सुरु आहे. 
  • जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांनी उत्तर कोरियाचे हे कृत्य हिंसक असल्याचे म्हटले असून, त्यांनी याप्रकरणी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक बोलावली आहे.

चालू घडामोडी : २८ नोव्हेंबर

इवांका ट्रम्प भारत दौऱ्यावर

  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या आणि सल्लागार इवांका ट्रम्प आणि त्यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ भारत दौऱ्यावर आले आहेत.
  • तीन दिवसांच्या जागतिक उद्योजकता शिखर परिषदेत (जीईएस) इव्हांका ट्रम्प सहभागी होणार आहेत. या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे.
  • ट्रम्प प्रशासनातील अधिकारी आणि उद्योजकांच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व त्या करत आहेत. अमेरिकेच्या ३८ राज्यांतील ३५० प्रतिनिधी या शिष्टमंडळात आहेत.
  • या शिखर परिषदेत ऊर्जा व पायाभूत सेवा, आरोग्य व जीवन विज्ञान, वित्तीय तंत्रज्ञान व डिजिटल अर्थव्यवस्था, माध्यम व मनोरंजन यांवर भर दिला जाणार आहे.
  • जागतिक उद्योजकता शिखर परिषद २०१७ (जीईएस) हैदराबाद येथे २८ ते ३० नोव्हेंबर या तीन दिवसात होणार आहे.
  • यावर्षी महिला उद्योजक आणि महिला उद्योजकांमध्ये असणारी शक्ती यावर परिषद विचारमंथन करण्यात येणार आहे.
  • तरुण तसेच नवोन्मेषक अनुभवी उद्योजक आणि गुंतवणुकदार यांना एकत्र आणण्याचे काम ही परिषद करत असते.
  • विविध देशातील तरुण या परिषदेत जमतात, आपले अनुभव आणि कल्पना इतरांना सांगतात तसेच जमलेल्या इतर तरुणांच्या कल्पनांवरही चर्चा करतात.
  • भारतातर्फे नीती आयोग भारत सरकारचे प्रतिनिधित्व या परिषदेत करणार आहे. (नीती आयोगाचे सीईओ: अमिताभ कांत)

प्रदीप सिंह खरोला एअर इंडियाचे सीएमडी

  • वरिष्ठ आयएएस अधिकारी प्रदीप सिंह खरोला यांची एअर इंडियाच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदी (सीएमडी) निवड करण्यात आली आहे.
  • खरोला हे कर्नाटक कॅडरचे असून सध्या ते बेंगळुरुतील मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालकपदी कार्यरत होते.
  • रेल्वे अपघाताचे प्रमाण वाढल्यानंतर ऑगस्टमध्ये एअर इंडियाचे सीएमडी अश्वनी लोहानी यांची रेल्वे मंडळाच्या प्रमुखपदी निवड झाली होती.
  • यानंतर नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने राजीव बन्सल यांची तीन महिन्यांसाठी एअर इंडियाच्या सीएमडीपदी नियुक्ती केली होती.
  • बन्सल यांचा कार्यकाळ संपत आला होता. त्यामुळे आता त्यांच्या जागी या पदावर प्रदीप सिंह खरोला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • एअर इंडियांवर सुमारे ५० हजार कोटींचे कर्ज असून एअर इंडियाचे खासगीकरण करण्याच्या दिशेने सरकारच्या हालचाली सुरु आहेत.

पंकज अडवाणीला १८वे विश्वविजेतेपद

  • भारताचा बिलियर्ड्स व स्नूकर खेळाडू पंकज अडवाणी याने आपले कमालीचे सातत्य कायम राखताना १८व्यांदा आयबीएसएफ जागतिक स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद पटकाविले आहे.
  • पंकजने १८वे शानदार विश्व जेतेपद पटकावताना ८-२ अशी एकतर्फी बाजी मारत इराणच्या आमिर सरखोशला पराभूत केले.
  • बिलियर्ड्स व स्नूकरमध्ये अठरा विश्व अजिंक्यपदे जिंकलेला अडवाणी ह्या खेळामधील सर्वोत्तम भारतीय खेळाडू आहे.
  • २००९साली पद्मश्री, २००४साली अर्जुन पुरस्कार, २००६साली राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार अशा पुरस्कारांनी त्याला गौरविण्यात आले आहे.

सीबीआय विशेष संचालकपदी अस्थाना कायम

  • सीबीआयच्या विशेष संचालकपदावरुन राकेश अस्थाना यांची नियुक्ती रद्द करण्यासाठी कॉमन कॉज या स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
  • अस्थाना यांच्या नियुक्तीमध्ये कुठल्याही नियमांचे उल्लंघन झाले नसल्याचे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचा निर्णय योग्य ठरवला.
  • आयपीएस अधिकारी राकेश अस्थाना यांची सीबीआयच्या विशेष संचालकपदी नियुक्ती अवैध आणि नियमबाह्य असल्याचा दावा कॉमन कॉजने केला होता.
  • इन्कम टॅक्स खात्याला छाप्यामध्ये सापडलेल्या डायरीमध्ये राकेश अस्थाना यांच्यावर आरोप होते. त्यामुळे अस्थाना यांची निवड रद्द करावी अशी याचिका कॉमन कॉजने दाखल केली होती.
  • अस्थाना हे १९८४च्या गुजरात कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. ते पूर्वी सीबीआयमध्ये अतिरिक्त संचालक पदावर होते.
  • ऑगस्टा वेस्टलँड, बिहारमधील चारा घोटाळा, किंगफिशर, मोईन कुरेशी आणि हसन अलीसारख्या अनेक हायप्रोफाईल घोटाळ्यांची ते चौकशी करत होते.
  • अस्थांनांनी फेब्रुवारी २००२च्या गोध्रामधील साबरमती एक्स्प्रेस जळीतकांडाच्या विशेष तपास पथकाचे नेतृत्त्वही केले होते.

चालू घडामोडी : २७ नोव्हेंबर

१२० बीपीएमला इफ्फी सुवर्णमयुर पुरस्कार

  • मोरोक्को येथे जन्मलेले फ्रेंच दिग्दर्शक रॉबिन कॅम्पिल्लो यांच्या ‘वन ट्वेंटी बिट्स पर मिनिट’ या चित्रपटाने ४८व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ‘गोल्डन पिकॉक’ सुवर्णमयुर पुरस्कार मिळवला.
  • ४० लाख रुपये, सुवर्ण मयुराची प्रतिमा आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
  • १९९०च्या दशकातल्या फ्रान्समधल्या आयुष्यावर आधारीत हा चित्रपट समलैंगिकता आणि एड्स या विषयावर भाष्य करतो.
  • नहुएल पेरेझ बिस्कायार्ट यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात अरनॉड व्हॅलोयस आणि अॅडेले हेनेल यांच्याही भूमिका आहेत.
  • याच महोत्सवात चीनचे दिग्दर्शक व्हीव्हीयन क्यू यांना 'अँजल्स वेअर व्हाईट' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. रजत मयुर स्मृतिचिन्ह आणि १५ लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • चीनमधल्या एका छोट्या गावात राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारांची कहाणी सांगणारा हा एक सामाजिक चित्रपट आहे. 
  • नहुएल पेरेझ बिस्कायार्ट यांना ‘वन ट्वेंटी बिट्स पर मिनिट’ या चित्रपटातल्या भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.
  • एड्सविरोधात लढणारा एक प्रेमळ साथीदार आणि आपल्या विचारांवर ठाम असलेल्या कार्यकर्त्याची भूमिका त्यांनी बजावली आहे.
  • महेश नारायणन् यांच्या ‘टेक ऑफ’ या मल्ल्याळी चित्रपटातल्या भूमिकेसाठी पार्वती टी के यांना उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
  • या चित्रपटात युद्धभूमीत बंडखोरांकडून ओलीस ठेवलेल्या पतीच्या सुटकेसाठी संघर्ष करणाऱ्या परिचारिकेची भूमिका त्यांनी साकारली आहे.
  • सर्वोत्कृष्ट अभिनयाच्या पुरस्कारासाठी रजत मयुर स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि १० लाख रुपये दिले जातात.
  • महेश नारायणन् यांना त्यांच्या ‘टेक ऑफ’ या पहिल्याच चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून विशेष ज्यूरी पुरस्कारही देण्यात आला.
  • विशेष ज्यूरी पुरस्कार म्हणून १५ लाख रुपये, रजत मयुर आणि सन्मानपत्र त्यांना प्रदान करण्यात आले.
  • सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मचा (कथापट) पुरस्कार बोलिवियाचे दिग्दर्शक किरो रुसो यांच्या 'डार्क स्कल' या चित्रपटाने मिळवला.
  • मनोज कदम यांच्या ‘क्षितिज’ या मराठी चित्रपटाने आयसीएफटी युनेस्को गांधी पदकाचा पुरस्कार मिळवला.
  • महात्मा गांधींचे शांतता आणि मानवी अधिकार, सांस्कृतिक अभिव्यक्तींमधे विविधता जपणे आणि वृद्धिंगत करणे, या युनेस्को तत्वांच्या आशयाचा अविष्कार करणाऱ्या चित्रपटांना हा पुरस्कार दिला जातो.
  • या महोत्सवात कॅनडाचे कला दिग्दर्शक ॲटम इगोयान यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. १० लाख रुपये, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या प्रतिष्ठेच्या पुरस्काराचे स्वरुप आहे.
  • यंदाच्या इफ्फीमध्ये ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना हिंदी सिनेसृष्टीत दिलेल्या एकूण योगदानाबद्दल ‘पर्सनलिटी ऑफ द इयर’ या पुरस्काराने गौरवण्यात आले.
  • गोव्यातील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात ४८वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार सोहळा पार पडला.

नॅशनल अँटी-प्रॉफिटिरिंग ऑथॉरिटी

  • वस्तू व सेवा कराच्या कार्यवाहीमुळे केंद्राचे ८ व राज्यांचे ९ अप्रत्यक्ष कर रद्द होऊन त्यांऐवजी संपूर्ण देशभर ‘वस्तू व सेवा कर’ (जीएसटी) हा एकच अप्रत्यक्ष कर लागू झाला.
  • परिणामी ग्राहक तथा उपभोक्त्यांवरचा करभार अंदाजे ५० टक्के (पूर्वीच्या करभाराच्या तुलनेत) घटेल अशी अपेक्षा होती.
  • वस्तू व सेवाकराच्या मूळ कायद्यातही पुरवठादार किंवा विक्रेत्यांनी किमती त्या प्रमाणात कमी करण्यासाठी ‘नफेखोरी प्रतिबंध’ कलमाची तरतूद आहे.
  • दुर्दैवाने वस्तू व सेवा कर लागू झाल्यानंतर बहुसंख्य वस्तू व सेवांच्या किमती वाढल्या असाच अनुभव आहे.
  • अलीकडेच केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्वसामान्य उपभोगाच्या वस्तू व सेवा कराच्या दरामध्ये लक्षणीय घट केल्यानंतर ती करघट पुरवठादारांनी ग्राहकांना वस्तू व सेवा कराच्या किमती कमी करून द्यावी, नफेखोरी करू नये; असे अपेक्षित होते. पण असे फारसे झालेले दिसत नाही.
  • हा अनुभव लक्षात घेता, सरकारने आता मूळ कायद्याचा आधार घेऊन ‘नॅशनल अँटी-प्रॉफिटिरिंग ऑथॉरिटी’ (नफेखोरीविरोधी राष्ट्रीय प्राधिकरण) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
  • या नव्या प्राधिकरणाचे सदस्य व अध्यक्ष यांची निवड करण्यासाठी मंत्रिमंडळ सचिव पी के सिन्हा यांच्या नेतृत्वाखाली ५ सदस्यांची निवड समिती नेमण्यात आली आहे.
 नॅशनल अँटी-प्रॉफिटिरिंग ऑथॉरिटी 
  • या नफेखोरीविरोधी राष्ट्रीय प्राधिकरणामध्ये पाच सदस्य असतील.
  • ही प्राधिकरण कर दरातील घटीचा लाभ ग्राहकांना कमी किमतीच्या स्वरूपात देण्याचा आदेश विक्रेत्यांना/पुरवठादारांना देऊ शकते.
  • असे न करणाऱ्या नफेखोर विक्रेत्यांना, हे अधिमंडळ अतिरिक्त नफा ग्राहकांना १८ टक्के व्याजाने परत देण्याचा आदेश देऊ शकते.
  • ग्राहक ओळखता येत नसेल, तर असमर्थनीय नफ्याची रक्कम उपभोक्ता कल्याण निधीमध्ये जमा करण्याचा आदेश देऊ शकते.
  • गैरव्यवहाराच्या गंभीर प्रकरणामध्ये हे प्राधिकरण, संबंधित विक्रेत्यांवर दंड बसवू शकते.
  • अधिक गंभीर गैरप्रकारात, संबंधित विक्रेता पुरवठादारांची वस्तू व सेवा कराखालची नोंदणी रद्द करण्याचा अधिकारही या अधिमंडळास दिला आहे.
  • या अधिमंडळाच्या कामकाज पद्धतीत राज्यपातळीवर एक परीक्षण समिती असेल. तर राष्ट्र पातळीवर एक स्थायी समिती असेल.
  • स्थानिक स्वरूपाच्या तक्रारी परीक्षण समितीकडे तपासल्या जातील; तर राष्ट्रीय स्वरूपाच्या तक्रारी स्थायी समितीमार्फत तपासल्या जातील.
  • या दोन समित्यांना आलेल्या तक्रारीत प्रथमदर्शनी तथ्य आढळले तर त्या तक्रारी प्रथम सुरक्षा संचालक यांच्याकडे चिकित्सेसाठी दिल्या जातील.
  • या सुरक्षा संचालकांच्या यंत्रणेमार्फत तपास केला जाईल व संबंधित अहवाल प्राधिकरणाकडे ३ महिन्यांच्या आत सादर केला जाईल.
  • या प्राधिकरणामार्फत पुरवठादारांनी वा विक्रेत्यांनी ग्राहकांना कर दर वा करभार घटीचा लाभ दिला का नाही, हे ठरविण्याची शास्त्रीय पद्धत ठरविण्याचाही अधिकार प्राप्त आहे.

डेमी नेल पीटर्स मिस युनिव्हर्स २०१७

  • लासवेगास येथे झालेल्या मिस युनिव्हर्स २०१७ स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेची डेमी नेल पीटर्स यंदाच्या मिस युनिव्हर्स किताबाची विजेती ठरली आहे.
  • मिस साऊथ आफ्रिका असलेल्या डेमी नेल पीटर्सला २०१६ची मिस युनिव्हर्स आयरिस मिट्टीनेएर (फ्रान्स) हिने मानाचा मुकुट प्रदान केला.
  • या स्पर्धेत मिस कोलंबिया लौरा गोन्जालेजने दुसरे स्थान तर मिस जमैका डेविना बॅनेटने तिसरे स्थान मिळवले.
  • मिस युनिव्हर्सचा किताब आपल्या नावे करायला जगभरातील ९२ सौंदर्यवतींनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
  • मिस युनिव्हर्सच्या स्पर्धेत श्रद्धा शशिधरने भारताचे नेतृत्व केले. पण श्रद्धाला टॉप १०पर्यंत मजल मारता आली नाही.

चालू घडामोडी : २६ नोव्हेंबर

आशियाई कबड्डी स्पर्धेत भारताचे वर्चस्व

  • भारताने आंतरराष्ट्रीय कबड्डीमधील आपले वर्चस्व पुन्हा सिद्ध करताना आशियाई कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष व महिला गटात सुवर्ण पदकाची कमाई केली.
  • इराणच्या गोरगान शहरात सुरु असलेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने अंतिम फेरीत पाकिस्तानवर ३६-२२ अशी मात करत स्पर्धेच्या विजेतेपदावर नाव कोरले.
  • एकाच स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा सलग दुसऱ्यांचा पराभव केला आहे. याआधी झालेल्या साखळी फेरीच्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ४४-१८ अशी मात केली होती.
  • अजय ठाकूरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने ४० मिनीटांच्या या सामन्यावर बहुतांश काळ आपले वर्चस्व कायम राखले.
  • दुसरीकडे अभिलाषा म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय महिला संघानेही अंतिम फेरीत दक्षिण कोरियावर मात करत विजेतेपदावर मोहोर उमटवली.
  • अंतिम फेरीत भारतीय महिला संघाला फारसा प्रतिकार झाला नाही. ४२-२०च्या फरकाने भारतीय महिला संघाने हा सामना आपल्या नावावर केला.

हाँगकाँग ओपनमध्ये सिंधूला उपविजेतेपद

  • हाँगकाँग ओपन सुपरसीरिज स्पर्धेत अंतिम सामन्यात झालेल्या पराभवामुळे भारताच्या पी. व्ही. सिंधूला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
  • जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू चीनच्या ताइ जु यिंग हिने सिंधूचा पराभव करत सुवर्णपदक पटकावले. यिंगचे हे या मोसमातील सुपर सीरिजचे पाचवे जेतेपद ठरले.
  • तर अंतिम सामन्यात मोक्याच्या वेळी झालेल्या चुका महागात पडल्याने सिंधूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. 
  • ४४ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या लढतीत यिंगविरुद्ध सिंधू १८-२१, १८-२१ अशी पराभूत झाली. विशेष म्हणजे सिंधूला सलग दुसऱ्यांदा यिंगविरुद्ध पराभूत व्हावे लागले.
  • यंदाच्या मोसमात सिंधूने सुपर सीरिज स्पर्धेच्या चार अंतिम लढती खेळल्या असून, त्यापैकी दोन लढती तिने जिंकल्या असून दोन लढती गमावल्या आहेत.
  • २००७पासून या स्पर्धेचा सुपर सीरिजमध्ये समावेश झाला असून, तेव्हापासून या स्पर्धेतील महिला एकेरीचे जेतेपद सलग दोनवेळा जिंकणारी यिंग पहिलीच खेळाडू ठरली.
  • मागील वर्षी सिंधुलाच पराभूत करत यिंगने ही स्पर्धा जिंकली होती. तसेच, यिंगने २०१४मध्येही ही स्पर्धा जिंकली होती.

जेफ बेजॉस जगात सर्वात श्रीमंत

  • जगातली सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ जेफ बेजॉस यांनी श्रीमंतीच्या बाबतीत बिल गेट्सचा १८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे.
  • ब्लॅक फ्रायडे सेल्सनंत त्यांच्या अॅमेझॉन कंपनीचे शेअर्स २ टक्के वाढल्याने बेजॉस यांची संपत्ती १००.३ अब्ज डॉलर्स (सुमारे ६,४६,५७५ कोटी रुपये)वर पोहोचली आहे.
  • त्यामुळे १०० अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक संपत्ती असणारी बेजॉस ही जगातली दुसरी व्यक्ती आहे. यापूर्वी १९९९मध्ये मायक्रोसॉफ्टचे संपादक बिल गेट्स यांनी हा विक्रम केला होता.
  • यावर्षी २३ नोव्हेंबरपर्यंत बेजॉस यांच्या संपत्तीत ३२.६ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. या आठवड्यात अॅमेझॉनला ५ टक्के वाढ मिळाली आहे.
  • बिल गेट्स यांच्याकडे अजूनही ८६.८ अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. त्यांनी मायक्रोसॉफ्टचे ७० कोटी शेअर्स, २.९ अब्ज डॉलर्स रोख आणि अन्य संपत्तीचे दान केले नसते तर ते आतापर्यंत १५० अब्ज डॉलर्सचे मालक असते.

चालू घडामोडी : २५ नोव्हेंबर

सूर्याच्या अभ्यासासाठी इस्रोचा आदित्य उपग्रह

  • सूर्याचे निरीक्षण करून अभ्यास करण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संघटना (इस्रो) ‘आदित्य एल-१’ हा उपग्रह सोडण्याची तयारी करत आहे.
  • उपग्रहाच्या प्रस्तावित नावातील ‘आदित्य’ हे सूर्याचे नाव आहे तर ‘एल-१’ हे अंतराळातील त्याच्या स्थानाचे निदर्शक आहे.
  • एल-१ म्हणजे ‘लॅगरेंज पॉईंट’. हे स्थान पृथ्वीपासून १५ लाख किमी दूर आहे. हा उपग्रह पृथ्वीवरून सोडल्यानंतर सुमारे ३ महिन्यांत या स्थानापर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा आहे.
  • त्या स्थानावर पोहोचल्यावर तो स्वत:भोवती घिरट्या घेत सूर्यनिरीक्षणाचे काम करेल. अशी कामगिरी करणे अद्याप नासालाही शक्य झालेले नाही.
  • ‘एल-१’ हे ठिकाण गुरुत्वीय शक्तींच्या अशा हद्दीवर आहे की तेथे ‘आदित्य’ला आपल्या कक्षेत स्थिर राहण्यासाठी फारशा ऊर्जेची गरज भासणार नाही.
  • अशा मोक्याच्या ठिकाणी राहून सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचे निरीक्षण व अभ्यास करणारा हा पहिला आणि एकमेव उपग्रह असेल.
  • सूर्य दर ११ वर्षांनी अधिक तेजस्वी होतो, असे मानले जाते. अशा प्रत्येक कालखंडाच्या सुरुवातीस सूर्याच्या पृष्ठभागावर डाग दिसू लागतात. हळूहळू ते मोठे मोठे होत जाऊन पुन्हा बारीक होतात.
  • सूर्याच्या नवतेजाचे पुढील सत्र बहुधा सन २०१९ किंवा २०२०मध्ये सुरु होईल व त्याच सुमारास ‘आदित्य’चे प्रक्षेपण करण्याची योजना आहे.
  • या उपग्रहाचे निर्धारित आयुष्य पाच वर्षांचे असले तरी तो १० वर्षांपर्यंतही काम करत राहू शकेल.
  • याआधी अंतराळातील ‘एल-१’ या स्थानी आणखीही काही उपग्रह सोडले गेले आहेत. त्यात अमेरिकेची नासा व युरोपीय अंतराळ संशोधन संस्थेने संयुक्तपणे सोडलेला सोडलेला सोलर अ‍ॅण्ड हेलिओस्फीरिक ऑब्झर्व्हेटरी (एसओएचओ) आणि नासाचा अ‍ॅडव्हान्स्ड कॉम्पोझिशन एप्लोरर (एसीई) यांचा समावेश आहे.
  • यापैकी ‘एसओएचओ’ उपग्रह सूर्याच्या तर ‘एसीई’ उपग्रह अंतराळातील वातावरणाच्या अभ्यासासाठी सोडला गेला.
  • सूर्याच्या तेजोवलयाचा अभ्यास करणारी, सर्व तरंगलहरींमध्ये सूर्याच्या प्रतिमा टिपणारी व पुनर्तेजस्वीतेच्या कालखंडात सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या भारित कणांचा शोध घेणारी वैज्ञानिक उपकरणे ‘आदित्य’वर असतील. हा उपग्रह आणि उपकरणे देशी बनावटीची असतील.
  • या उपग्रहाची पहिली सैंधांतिक कल्पना ‘इस्रो’च्या वैज्ञानिकांनी सन २००८मध्ये मांडली तेव्हा त्यावर एकच उपकरण असेल व उपग्रहाचे वजन ४०० किलो असेल असे गृहित धरले गेले होते.
 ‘आदित्य’ची गुणवैशिष्ट्ये 
  • एकूण वजन अंदाजे - १,५०० किलो
  • एकूण उपकरणे सात. त्यांचे वजन २५० किलो
  • सर्वात मोठे उपकरण ‘व्हिजिबल इमिशन लाइन कॉरोनाग्राफ’ (व्हीएलइसी) वजन १७० किलो
  • ‘सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप’, वजन ३५ किलो.
  • याखेरीज ‘एक्स-रे स्पेक्ट्रोमिटर’

भारतीय हॉकी संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी राऊल एहरेन

  • हॉलंडचे माजी खेळाडू राऊल एहरेन यांची भारतीय हॉकी संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी नेमणूक करण्यात आली आहे.
  • ओडीशातील भुवनेश्वर शहरात खेळवल्या जाणाऱ्या वर्ल्ड हॉकी लीग स्पर्धेसाठी भारतीय हॉकी संघाला सर्वोत्तम प्रशिक्षण मिळण्याच्या दृष्टीकोनातून ही नियुक्ती करण्यात आली आहे.
  • मुख्य प्रशिक्षक जोर्द मरीन यांना राऊल एहरेन प्रशिक्षणाच्या कामात मदत करणार आहेत. मरीन आणि एहरेन यांनी याआधी हॉलंडच्या ज्युनिअर संघासाठी प्रशिक्षक म्हणून काम केलेले आहे.
  • वर्ल्ड हॉकी लीग स्पर्धेला १ डिसेंबर पासून सुरुवात होत असून, एहरेन यांना या स्पर्धेपुरतीच भारतीय संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

हाफीज सईदची नजरकैदेतून सुटका

  • मुंबई २६/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि जमात-ऊद-दावा या अतिरेकी संघटनेचा प्रमुख हाफीज सईदची २३ नोव्हेंबर रोजी नजरकैदेतून सुटका झाली आहे.
  • हाफिज सईदचं अभिनंदन करण्यासाठी जमात-उद-दावाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते. सुटका झाल्यानंतर हाफिज सईदने समर्थकांसोबत आनंद साजरा केला.
  • सुटका झाल्यानंतर भारत आणि अमेरिकेकडून दबाव टाकण्यात आल्यानेच आपल्याला नजरकैदेत ठेवण्यात आल्याचा आरोप हाफिज सईदने केला.
  • या सुटकेनंतर झाल्यामुळे हाफिज सईद पुन्हा एकदा दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय होण्याची शक्यता आहे. 
  • सईद आणि त्याच्या ४ साथीदारांना ३१ जानेवारीपासून नजरकैदेत ठेवण्यात आले होते. जनसुरक्षा कायद्यान्वये दोनवेळा या सर्वांची नजरकैद वाढवण्यात आली होती.
  • गेल्या महिन्यात सईदच्या नजरकैदेत ३० दिवसांची वाढ करण्यात आली होती. याची मुदत २३ नोव्हेंबर रोजी संपली असून, पंजाब प्रांताच्या न्यायिक समीक्षा बोर्डाच्या आदेशामुळे त्याला नजरकैदेतून मुक्त करण्यात आले आहे.

चालू घडामोडी : २४ नोव्हेंबर

विधिज्ञ हबिबुल्लाह बादशा यांचे निधन

  • मद्रास बार कौन्सिलचे प्रसिद्ध वकील आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचे विधिज्ञ हबिबुल्लाह बादशा यांचे २२ नोव्हेंबर रोजी निधन झाले.
  • सरकारतर्फे देऊ करण्यात आलेले आधी उच्च न्यायालय आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशपद त्यांनी विनम्रपणे नाकारले व तामिळनाडूमध्येच वकिली व्यवसायाबरोबरच विविध संस्थांच्या उभारणीत आपले आयुष्य खर्ची घातले.
  • ८ मार्च १९३३ रोजी एका धनाढय़ व प्रतिष्ठित कुटुंबात त्यांचा जन्म झाला. नामांकित कॉन्व्हेंट शाळेत त्यांचे शालेय शिक्षण झाले.
  • पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुढे कायद्याचा अभ्यास केला. १९५७मध्ये ते मद्रास बार कौन्सिलचे सदस्य बनले.
  • १९७०मध्ये ते ३७ वर्षांचे असताना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदासाठी त्यांच्या नावाची शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु हे पद स्वीज्कार्ण्यास त्यांनी नकार दिला.
  • पुढे अनेक प्रकरणांत केंद्राबरोबरच राज्य सरकारचीही बाजू त्यांनी प्रभावीपणे विविध न्यायालयांत मांडली. नंतर ते काही काळ तामिळनाडूचे महाधिवक्ताही होते.
  • करुणानिधी यांच्यावर घटनेची प्रत जाळल्याचा खटला उभा राहिला तेव्हा त्यांच्या वतीने बादशा यांनीच युक्तिवाद केला.
  • १९८६मध्ये त्यांना थेट सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशपद देऊ करण्यात आले होते, पण तेही त्यांनी विनम्रपणे नाकारून राज्यात वकिलीच करण्यात रस असल्याचे सरकारला कळवले.
  • वकिली व्यवसायाबरोबरच विविध शैक्षणिक संस्थांच्या विकासातही ते सक्रिय होते. प्रसिद्ध अपोलो हॉस्पिटलचे ते एक संस्थापक-संचालक होते.

इजिप्तमध्ये मशिदीवर दहशतवादी हल्ला

  • इजिप्तमधील उत्तर सिनाई प्रांतातील मशिदीवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २३५ जणांचा मृत्यू झाला आहे असून, जवळपास १०० जण जखमी झाले आहेत.
  • उत्तर सिनाई हा इजिप्तमधील अशांत प्रांत म्हणून ओळखला जातो. या भागाच्या पश्चिमेला साधारण ४० किलोमीटर अंतरावर अल-अरिश शहरात अल रॉदाह मशीद आहे.
  • या मशिदीत नमाज सुरु असताना दहशतवाद्यांनी बॉम्बहल्ला केला. त्यावेळी मशिदीत मोठी गर्दी होती. यानंतर दहशतवाद्यांनी मशिदीतील लोकांवर अंदाधुंद गोळीबार सुरु केला.
  • इजिप्तचे सैन्य उत्तर सिनाई प्रांतात आयसिस या दहशतवादी संघटनेविरोधात धडक कारवाई करत असताना हा हल्ला झाला आहे.
  • या भागात आधीही दहशतवाद्यांनी अनेक पोलीस कर्मचारी आणि सैनिकांच्या हत्या केल्या आहेत. याशिवाय प्रशासनाला सहकार्य करणाऱ्या नागरिकांच्याही आयसिसच्या दहशतवाद्यांकडून क्रूर हत्या करण्यात आल्या आहेत.
  • इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष : अब्देल फतह अल सीसी

सुनील मित्तल यांचे ७ हजार कोटींचे दान

  • सुनील मित्तल यांनी सामाजिक कामांसाठी आपल्या एकूण संपत्तीतील १० टक्के भाग म्हणजे सुमारे ७ हजार कोटी रुपये दान करण्याची घोषणा केली आहे.
  • याशिवाय त्यांनी एअरटेल कंपनीतील आपले ३ टक्के शेअर्सही सामाजिक कामांच्या खर्चासाठी दिले आहेत.
  • सुनील मित्तल जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी ‘भारती एअरटेल’चे चेअरमन आहेत.
  • दुर्बल आणि वंचित समाज घटकांमधील तरुण-तरुणींना मोफत शिक्षण घेता यावं म्हणून ‘सत्य भारती विश्वविद्यापीठ’ स्थापन करण्याची घोषणाही सुनील मित्तल यांनी केली आहे.
  • हे विश्वविद्यापीठ विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित अभ्यासक्रमांसाठी वाहिलेले असेल. २०२१साली विश्वविद्यापीठ सुरु करण्याचा मित्तल यांचा मानस आहे.
  • उत्तर भारतात हे विद्यापीठ सुरू करण्यात येणार आहे. येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि समाजातील वंचित विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा उद्देश आहे.
  • २००७साली सुनील मित्तल यांना भारत सरकारचा तिसरा सर्वोच्च पुरस्कार अर्थात ‘पद्मभूषण’ने गौरवण्यात आले.
  • १५ जून २०१५ रोजी सुनील मित्तल यांनी इंटरनॅशनल चेंबर ऑफ कॉमर्सच्या चेअरमनपदी निवड झाली.
  • यापूर्वी इन्फोसिसच्या नंदन नीलेकणी आणि त्यांची पत्नी रोहिणी नीलेकणी यांनीही आपली अर्धी संपत्ती सामाजिक कार्यासाठी दान करण्याची घोषणा केली आहे.

चालू घडामोडी : २३ नोव्हेंबर

प्राप्तीकरात सुधारणेसाठी कृती दलाची स्थापना

  • वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करुन अप्रत्यक्ष कर व्यवस्थेत अमूलाग्र बदल केल्यानंतर नरेंद्र मोदी सरकार आता प्रत्यक्ष करातील सुधारणेकडे वळले आहे.
  • सरकारने ५० वर्षे जुन्या १९६१च्या प्राप्तिकर कायद्याच्या पुनरावलोकनासाठी सात सदस्यीय कृती दलाची स्थापना केली आहे.
  • केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे सदस्य अरबिंद मोदी यांच्याकडे कृती दलाच्या प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
  • गिरीश आहुजा (सीए), राजीव मेमानी (सीए), अहमदाबादचे कर अधिवक्ता मुकेश पटेल, मानसी केडिया आणि निवृत्त भारतीय महसूल सेवेचे अधिकारी जी.सी.श्रीवास्तव या दलाचे सदस्य असतील.
  • या व्यतिरिक्त देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यन हे समितीचे कायमस्वरुपी विशेष निमंत्रित सदस्य असतील.
  • हे कृती दल ५० वर्ष जुन्या इन्कम टॅक्स कायद्याचा आढावा घेईल व देशाच्या आर्थिक गरजा ध्यानात घेऊन नवीन प्रत्यक्ष (डायरेक्ट) कर कायद्याचा मसुदा तयार करेल.
  • अन्य देशातील प्रत्यक्ष कर कायद्यांचा अभ्यास करुन आजच्या काळाशी सुसंगत नवीन कायद्याचा मसुदा तयार केला जाईल.
  • या कृती दलाला आपला अहवाल सादर करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे.
  • नवीन प्रत्यक्ष कर कायद्याचा मसुदा अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत तयार करण्याचा सरकारचा मानस आहे.
 यापूर्वीच्या सुधारणेच्या हालचाली 
  • यापूर्वी २००० साली तत्कालीन यूपीए सरकारने कर प्रक्रियेच्या सुलभीकरणाचे पाऊल म्हणून प्रत्यक्ष कर संहिता लागू करण्याचा निर्णय घेतला होता. 
  • २०१०मध्ये संसदेमध्ये ‘प्रत्यक्ष कर संहिता (डीटीसी) विधेयक’ मांडण्यात आले. परंतु १५ लोकसभेच्या विसर्जनासह त्या विधेयकाची मंजुरी मागे पडली.
  • प्रत्यक्ष कर कायद्यात बदल करण्याचा प्रयत्न २००९मध्येही झाला होता. त्या वेळी पी. चिदंबरम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केलेली प्रत्यक्ष करसंहिता (डीटीसी) प्रणव मुखर्जी यांनी जारी केली होती. परंतु, त्यासंबंधीचे विधेयक मांडले गेले नाही.

शुभांगी स्वरूप नौदलातील पहिली महिला वैमानिक

  • उत्तर प्रदेशातील शुभांगी स्वरूप या तरुणीने नुकताच नौदलातील पहिली महिला वैमानिक ठरण्याचा मान मिळवला आहे.
  • पुरुषांचे वर्चस्व असलेल्या भारतीय नौदलाच्या इतिहासात एका महिलेचा पायलट म्हणून समावेश करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
  • शुभांगीसह आस्था सहगल (दिल्ली), रूपा ए. (पुद्दुचेरी) आणि शक्तिमाया एस. (केरळ) या तिघी नौदलाच्या नेव्हल आर्मामेंट इन्स्पेक्टरेट विभागातील पहिल्याच महिला अधिकारी ठरल्या आहेत.
  • आतापर्यंत नौदलाच्या एव्हिएशन विभागात महिला अधिकाऱ्यांचा समावेश होता, मात्र त्यांची भूमिका एअर ट्रॅफिक कंट्रोलर किंवा विमानातील निरीक्षक एवढीच मर्यादित होती.
  • नौदलात महिलांना पायलट म्हणून घेण्यासाठी २०१५मध्येच मंजुरी देण्यात आली होती.
  • शुभांगी यांना पी-८ आय विमान चालविण्याची संधी दिली जाऊ शकते. त्यासाठी त्यांना प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे.
  • हिंदी महासागरात चीनच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी या महिला पायलटचा उपयोग होऊ शकतो.

चालू घडामोडी : २२ नोव्हेंबर

ब्राह्मोसची सुखोई विमानावरुन यशस्वी चाचणी

  • भारत आणि रशिया यांची संयुक्त निर्मिती असणारे सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ब्राह्मोसची २२ नोव्हेंबर रोजी भारतीय हवाई दलाच्या सुखोई ३० एमकेआय या जेट विमानावरुन यशस्वी चाचणी करण्यात आली.
  • आजवर उपग्रह प्रक्षेपण वाहनाच्या माध्यमांतून क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. मात्र, भारताने पहिल्यांदाच जेट विमानाचा असा प्रक्षेपण वाहनासारखा वापर करुन या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली.
  • सुमारे अडीच टन वजनाच्या या क्षेपणास्त्राची बंगालच्या उपसागरात चाचणी घेण्यात आली. अशा आणखी दोन चाचण्या घेण्याचा भारताचा मानस आहे.
  • जमीन, हवा आणि पाणी अशा तिन्ही ठिकाणांहून सोडता येऊ शकणारे ब्राह्मोस हे जगातील पहिले क्षेपणास्त्र ठरले आहे.
  • ब्राह्मोस क्षेपणास्त्राचे वजन २.५ टन आहे. आवाजाच्या वेगापेक्षा सुमारे तिप्पट वेगाने हल्ला करण्याची क्षमता ब्राह्मोसमध्ये आहे. अचूकता आणि वेग हे ब्राह्मोसचे वैशिष्टय आहे.
  • भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) व रशियाची ‘एनपीएमओ’ कंपनी संयुक्तपणे या क्षेपणास्त्राचे उत्पादन करते.
  • हवेतून जमिनीवर मारा करण्याची क्षमता असणारे हे क्षेपणास्त्र दहशतवाद्यांची ठिकाणे अचूकरित्या भेदू शकते. याशिवाय जमिनीखालील बंकर्स उद्धस्त करण्याची क्षमताही या क्षेपणास्त्रात आहे.
  • ते लढाऊ विमानावर बसवून वाहून नेता यावे यासाठी हिंदुस्तान एयरोनॉटिक्सने (एचएएल) त्यात सुयोग्य बदल केले.
  • जून २०१६मध्ये भारत ३४ देशांची संघटना असलेल्या मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रिझिम संघटनेचा सदस्य बनल्यापासून क्षेपणास्त्राच्या मारक क्षमतेवरील निर्बंध उठले आहे.
  • त्यामुळे सुरक्षा दले आता ब्राह्मोसच्या ४५० किमीपर्यंत मारक क्षमता असलेल्या आवृत्तीची चाचणी करण्याच्या तयारीत आहेत.

प्रधानमंत्री मातृवंदना योजना

  • मातांना पहिल्या प्रसूतीवेळी पाच हजार रुपयांचे अनुदान देणारी ‘प्रधानमंत्री मातृवंदना योजना’ १ जानेवारी २०१८पासून महाराष्ट्रात लागू करण्यात येत आहे.
  • केंद्र आणि राज्याच्या शासकीय व निमशासकीय सेवेत असणाऱ्या महिला वगळता सर्व महिला या योजनेसाठी पात्र राहतील. २०१७मध्ये पहिली प्रसूती झालेल्या माताही या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.
  • गेल्याच वर्षी भारतातील अन्य राज्यांमध्ये केंद्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाची ही योजना सुरू करण्यात आली.
  • मात्र महाराष्ट्रामध्ये ही योजना महिला व बालकल्याण विभागाने राबवायची की आरोग्य विभागाने राबवायची याचा निर्णय लवकर झाला नाही.
  • अखेर ही योजना आरोग्य विभागाने राबविण्यावर शिक्कामोर्तब झाले असून, त्यानुसार नियोजनही सुरू झाले आहे.
  • अधिकाधिक गरोदर मातांनी शासकीय रुग्णालयांमध्ये प्रसूतीसाठी नोंद करावी. त्यानिमित्ताने त्या महिलेचे आरोग्य कार्ड तयार व्हावे आणि प्रसूतीनंतर बाळाला आवश्यक त्या सर्व लसी दिल्या जाव्यात, हे उद्देश ठेवून ही योजना भारतभर लागू करण्यात आली आहे.
  • अगदी खासगी रुग्णालयातही प्रसूती झाली तरी त्या मातेला हे अनुदान मिळणार आहे. मात्र पहिल्यांदा शासकीय रुग्णालयात नोंद करून आरोग्य कार्ड तयार करून घेणे बंधनकारक राहणार आहे.

झिम्बाब्वेतील मुगाबे यांची राजवट संपुष्टात

  • झिम्बाब्वेच्या संसदेत महाभियोगाची कारवाई सुरू झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांनी अखेर २१ नोव्हेंबर रोजी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. 
  • त्यामुळे १९८०साली ब्रिटनकडून स्वातंत्र्य मिळवल्यापासून झिम्बाब्वेमध्ये सुरू झालेली ३७ वर्षांची मुगाबे यांची राजवट संपुष्टात आली आहे.
  • जगातील सर्वाधिक काळ सत्तेवर असलेले शासक व ‘ग्रँड ओल्ड मॅन ऑफ आफ्रिकन पॉलिटिक्स’ म्हणून ओळखले जाणारे मुगाबे नेमके कुठे आहेत, हे स्पष्ट झालेले नाही.
  • गेले आठवडाभर देशात त्यांच्याविरुद्ध उठाव सुरु असताना मुगाबे लष्कराच्या नजरकैदेत राहून सत्तेला चिकटून बसले होते.
  • उपराष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मानान्गावा यांना मुगाबे यांनी अचानक पदच्यूत केल्यापासून झिम्बाब्वेमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती.
  • मुगाबे यांची पत्नी ग्रेस या अध्यक्षपद मिळवण्यासाठी उत्सुक होत्या आणि त्यादृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू होते. मात्र मानान्गावा यांना लष्कर, राजकीय नेते आणि सामान्य जनतेतून मोठा पाठिंबा होता.
  • यामुळे सत्ताधारी झानु-पीएफ पक्षाने मुगाबे यांना पक्षाध्यक्ष पदावरून दूर करून राष्ट्राध्यक्ष पदावरून स्वत:हून पायउतार होण्याची विनंती केली होती.
  • परंतु ती झुगारत मुगाबे यांनी बंडखोरीचा पवित्रा घेत राष्ट्राला उद्देशून भाषण कले व त्यात सत्ता न सोडण्याचे संकेत दिले.
  • त्यामुळे झानु-पीफ पक्षाने दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन भरवून त्यांच्यावर महाभियोगाची कारवाई सुरु केली होती. परंतु ती पूर्ण होण्याआधीच मुगाबे यांनी आपला राजीनामा सादर केला.
  • आठवडाभराच्या या उलथापालथीनंतर ‘क्रोकोडाइल’ म्हणून ओळखले जाणारे इमॅन्युअल मानान्गावा झिम्बाब्वेचे नवे राष्ट्राध्यक्ष होतील, अशी शक्यता आहे.

चालू घडामोडी : २१ नोव्हेंबर

दलवीर भंडारी यांची आयसीजे न्यायाधीशपदी फेरनिवड

  • भारताचे दलवीर भंडारी यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशपदी फेरनिवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात त्यांची ही दुसरी टर्म आहे.
  • आंतरराष्ट्रीय न्यायालयात १५ न्यायाधीशांची संयुक्त राष्ट्रे आणि त्यांच्या सुरक्षा परिषदेतर्फे ९ वर्षांसाठी नेमणूक होते.
  • मुंबई हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातील उल्लेखनीय कामगिरीनंतर भंडारी यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयात निवड करण्यात आली होती.
  • भंडारी यांचा सध्याचा कार्यकाळ ५ फेब्रुवारी २०१८ रोजी संपत असून, भारताने या पदावरील फेरनियुक्तीसाठी त्यांचे पुन्हा नामांकन जाहीर केले होते.
  • न्या. भंडारी यांच्या फेरनियुक्तीत ब्रिटनचा अडथळा होता. ब्रिटनने या पदासाठी क्रिस्टोफर ग्रीनवुड यांना नामांकन जाहीर केले होते.
  • संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत ब्रिटनचा समावेश असून अमेरिका, रशिया, फ्रान्स आणि चीन या देशांचे ग्रीनवुड यांना समर्थन होते.
  • परंतु अखेरच्या क्षणी ब्रिटनने क्रिस्टोफर ग्रीनवुड यांचे नामांकन मागे घेतल्याने भंडारी यांची पुन्हा एकदा निवड झाली आहे. 
  • न्यूयॉर्कमध्ये असलेल्या संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात ही निवडणूक पार पडली. भंडारी यांना संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत १९३पैकी १८३ मते मिळाली, तर सुरक्षा परिषदेत सर्व १५ सदस्यांची मते मिळाली.
 दलवीर भंडारी यांच्याबद्दल 
  • दलवीर भंडारी यांचा जन्म १ ऑक्टोबर १९४७ रोजी झाला. राजस्थानमधील जोधपूर विद्यापीठातून त्यांनी मानव्यशास्त्र आणि कायद्याची पदवी घेतली.
  • यानंतर त्यांनी अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी स्कूल येथून कायद्यातील पदव्युत्तर पदवी मिळवली. काही काळ शिकागो येथे वकिली केल्यानंतर ते भारतात परतले.
  • १९७३ ते १९७६ या काळात राजस्थान हायकोर्टात वकिली केली. तेथून १९७७मध्ये ते दिल्ली हायकोर्टात वकिली करण्यासाठी गेले.
  • या क्षेत्रातील २३ वर्षांच्या अनुभवानंतर १९९१साली त्यांची दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीशपदी नेमणूक झाली.
  • त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणूनही त्यांनी कार्यभार सांभाळला. ऑक्टोबर २००५मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली.
  • तेथील उल्लेखनीय कामगिरीनंतर भंडारी यांची १९ जून २०१२ रोजी द हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात निवड झाली.
  • इंटरनॅशनल लॉ असोसिएशनच्या भारतीय शाखेचे कार्यकारी सदस्य म्हणून भंडारी यांची १९९४सालापासून निवड झाली.
  • २००७साली त्यांची इंडिया इंटरनॅशनल लॉ फाऊंडेशनच्या अध्यक्षपदी निवड झाली. अद्याप ते पद त्यांच्याकडे आहे.
  • माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने हेरगिरीच्या आरोपाखाली सुनावलेल्या देहदंडाच्या शिक्षेला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली होती. या प्रकरणातील १५ न्यायाधीशांमध्ये न्या. दलवीर भंडारी यांचा समावेश होता.
 आंतरराष्ट्रीय न्यायालय 
  • आंतरराष्ट्रीय न्यायालय (International Court of Justice) हे सदस्य देशांमधील वाद सोडविण्याचे संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्य न्यायिक अंग आहे.
  • त्याची स्थापना १९४५मध्ये झाली असून, नेदरलँड्समधील हेग ह्या शहरात हे न्यायालय स्थित आहे. आंतरराष्ट्रीय कायदेशीर विवाद व तंटे सोडवणे हे ह्या न्यायालयाचे मुख्य कार्य आहे.
  • या न्यायालयात एकूण १५ न्यायाधीशांची आमसभा व सुरक्षा परिषदेकडून निवड करण्यात येते. प्रत्येक न्यायाधीशांची मुदत एका वेळी नऊ वर्षे असून, ते फेरनिवडीस पात्र असतात.

नासकॉमच्या अध्यक्षपदी देबजानी घोष

  • ‘नासकॉम’ (NASSCOM / National Association of Software and Services Companies) या संस्थच्या अध्यक्षपदी देबजानी घोष यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • भारताच्या माहिती तंत्रज्ञान आणि आऊटसोर्सिग उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘नासकॉम’च्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष आहेत.
  • देबजानी घोष या येत्या मार्च २०१८पासून नासकॉमच्या अध्यक्षपदाची सूत्रे आर. चंद्रशेखर यांच्याकडून स्वीकारतील.
  • घोष या भारतीय असल्या तरी त्या इंटेल या अमेरिकी कंपनीच्या प्रतिनिधी म्हणून नासकॉमवर कार्यरत होत्या.
  • इंटेलच्या दक्षिण आशिया विभागाच्या व्यवस्थापकीय संचालिकापदावरून फेब्रुवारी २०१७ मध्ये त्यांनी निवृत्ती स्वीकारली.
  • इंटेलमधून बाहेर पडल्यानंतर घोष सध्या येस बँकेच्या संचालक मंडळावर तसेच सिस्कोच्या सल्लागार मंडळावर कार्यरत आहेत.
  • नवोद्योगांना प्रोत्साहन देणाऱ्या स्वर्गदूत गुंतवणूकदार (एंजल इन्व्हेस्टर) म्हणूनही त्या भूमिका बजावत आहेत.
  • इनक्लोव्ह या गतिमंद, विशेष सक्षम व्यक्तींसाठी अनुरूप जोडीदार शोधणाऱ्या संकेतस्थळाची त्या आर्थिक पाठराखण करीत आहेत. फिक्कीच्या ‘इनोव्हेशन समिती’चे प्रमुखपदही त्यांच्याकडे होते.

चीनकडून अत्याधुनिक डीएफ ४१ची चाचणी

  • जगात कुठेही असलेल्या लक्ष्याचा अचूक वेध घेण्याची क्षमता असलेल्या ‘डाँगफेंग ४१’ (डीएफ ४१) या अत्याधुनिक आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चीनने नुकतीच चाचणी घेतली आहे.
  • या क्षेपणास्त्राचा पल्ला १२ हजार ते १५ हजार किलोमीटर असल्याने ते अमेरिका, युरोपसह जगातील कोणत्याही भागात पोहचू शकते.
  • एकावेळी अनेक अण्वस्त्रे जगाच्या कोणत्याही भागात डागण्याची त्याची क्षमता आहे. त्याला ‘मल्टिपल इंडिपेंडंटली टार्गेटेबल रि-एंट्री व्हेईकल’ असे म्हणतात.
  • त्याचा वेग ध्वनीच्या वेगाच्या दहापट (१० मॅकहून अधिक) असल्याने ते क्षेपणास्त्रभेदी क्षेपणास्त्रांना व अन्य क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणांना चकवा देऊ शकते.
  • चीनच्या ताफ्यात यापूर्वीच आंतरखंडीय क्षेपणास्त्रे असून, हे क्षपणास्त्र पुढील वर्षी चीनच्या सेनादलांच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता आहे.
  • अत्याधुनिक डाँगफेंग ४१ हे क्षेपणास्त्र विकसित करण्याचे काम तेथे १९९०च्या दशकापासून सुरू आहे. या क्षेपणास्त्राच्या २०१२पासून ८ चाचण्या झाल्या आहेत.
  • ‘डाँगफेंग-४१’ हे जगातील सर्वात आधुनिक आंतरखंडीय क्षेपणास्त्रांपैकी एक असल्याचे मानले जाते. या क्षेपणास्त्रामुळे चीनच्या अण्वस्त्र व संरक्षणसज्जतेत मोठी वाढ होणार आहे.

दहशतवाद पुरस्कृत देशांच्या यादीत उत्तर कोरिया

  • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला दहशतवादाचे समर्थन करणाऱ्या देशांच्या यादीत पुन्हा एकदा टाकल्याची घोषणा केली आहे.
  • २००८मध्ये उत्तर कोरियाचे नाव या यादीत टाकण्यात आले होते. परंतु जॉर्ज डब्लू बुश यांच्या शिष्टाईमुळे ते हटवण्यात आले होते.
  • ट्रम्प यांनी आण्विक कार्यक्रम आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवाद्यांच्या कारवाईचे समर्थन केल्याप्रकरणी उत्तर कोरियाला दहशतवाद पुरस्कृत देशांच्या यादीत टाकले आहे.
  • उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग ऊन यांनी संयुक्त राष्ट्राने घातलेले निर्बंध झुगारून स्वतःचा आण्विक कार्यक्रम आणि अणुचाचणी सुरूच ठेवली आहे.

चालू घडामोडी : २० नोव्हेंबर

मनमोहन सिंग यांना इंदिरा गांधी पुरस्कार

  • माजी पंतप्रधान आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांना या वर्षीचा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • शांतता, नि:शस्त्रीकरण आणि विकास या क्षेत्रांतील भरीव कामगिरीसाठी हा पुरस्कार दरवर्षी इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टकडून इंदिरा गांधी यांच्या जन्मदिनी (१९ नोव्हेंबर) दिला जातो. 
  • राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखालील निवड मंडळाने डॉ. मनमोहन सिंग यांची या पुरस्कारासाठी निवड केली.
  • २००४ ते २०१४ अशा १० वर्षांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत भारताच्या आर्थिक सामाजिक विकासात दिलेले भरीव योगदान, जगात भारताची प्रतिष्ठा उंचावणे, शेजारी व जगातील इतर महत्त्वाच्या देशांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करणे आणि धर्म, जात, भाषा वा पंथ यांचा विचार न करता सर्वसामान्य नागरिकांच्या ख्यालीखुशाली व सुरक्षेसाठी सतत झटणे यासाठी डॉ. मनमोहन सिंग यांना गौरविण्यात आले.
  • सलग पाच वर्षांचे दोन कालखंड यशस्वीपणे पूर्ण करणारे डॉ. सिंग हे भारताचे तिसरे पंतप्रधान आहेत.
  • अमेरिकेसोबत झालेला नागरी अणु सुरक्षा करार व कोपनहेगन येथे झालेला जागतिक हवामान बदलाविषयीचा समझोता ही त्यांची भरीव कामगिरी ठरली.

७४ टक्के भारतीयांना मोदी सरकारवर विश्वास

  • वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अहवालानुसार केंद्रातील मोदी सरकार हे जगातील विश्वासार्ह देशांच्या सरकारांमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.
  • वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जगातील सर्वाधिक विश्वासार्ह सरकारांची यादी जाहीर केली. यामध्ये स्वित्झर्लंड आणि इंडोनेशियातील सरकार अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानी आहेत तर भारत यात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
  • या अहवालानुसार, भारतातील तीन तृतीयांश अर्थात ७४ टक्के भारतीयांनी केंद्र सरकारवर विश्वास व्यक्त केला आहे.
  • यासाठी फोरमने जगभरातील देशांची अर्थव्यवस्था, तेथील राजकीय घडामोडी आणि भ्रष्टाचार मिटवण्यासाठी केलेल्या उपाययोजना यांचा निकष लावला.
  • जगातील इतर देशातील सरकारांच्या विश्वासार्हतेबाबत ग्रीसची परिस्थिती भयावह आहे. या देशातील केवळ १० नागरिकांनीच देशाच्या सरकारवर विश्वास व्यक्त केला आहे.
  • विश्वासार्ह सरकारांच्या यादीमध्ये अनुक्रमे स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, भारत, ल्युक्झेंबर्ग, नॉर्वे, कॅनडा, तुर्की, न्युझीलंड, आयर्लंड, नेदरलँड, जर्मनी, फिनलँड, स्वीडन, डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलिया या देशांचा क्रमांक लागतो.

काँग्रेस नेते प्रियरंजन दासमुन्शी यांचे निधन

  • पक्षाघाताच्या मोठ्या झटक्यानंतर गेल्या ९ वर्षांपासून कोमात असलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रियरंजन दासमुन्शी यांचे २० नोव्हेंबर रोजी निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते.
  • दासमुन्शी यांना २००८ मध्ये पक्षाघाताचा मोठा झटका आला होता, यादरम्यान ते कोमात गेले. त्यानंतर २००९पासून त्यांच्यावर उपचार सुरु होते.
  • प्रियरंजन दासमुन्शी हे पश्चिम बंगाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते. त्याचबरोबर ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे ते माजी अध्यक्ष राहिले आहेत.
  • पश्चिम बंगालचे स्ट्राँगमॅन म्हणूनही त्यांची ख्याती होती. १९९९पासून पश्चिम बंगालच्या रायगंज मतदारसंघाचे त्यांनी नेतृत्व केले.
  • आघाडी सरकारच्या काळात पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी माहिती व प्रसारण मंत्रालयाचा कारभार पाहिला.
  • त्यांच्या कार्यकाळात फॅशन टिव्हीवर आक्षेपार्ह मजकूर दाखवल्यावरुन बंदी घालण्यात आली होती.

विम्बल्डन चॅम्पियन जाना नोवोत्नाचे निधन

  • चेक रिपब्लिकची माजी विम्बल्डन चॅम्पियन जाना नोवोत्नाचे १९ नोव्हेंबर रोजी वयाच्या ४९व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले.
  • तिच्या १४ वर्षांच्या कारकिर्दीत तिने १७ ग्रँड स्लॅम जिंकले. दुहेरी प्रकारात तिने ७६ विजेतेपदे तर एकेरी प्रकारात २४ विजेतेपदांवर नाव कोरले.
  • १९८८मध्ये तिला ऑलिम्पिकचे रौप्यपदक मिळाले. तर १९९६मध्ये अटलांटा गेम्समध्ये तिने रौप्य आणि कांस्य पदकांची कमाई केली.
  • २००५मध्ये तिने कोचिंग करायला सुरूवात केली. २०१३मध्ये जाना निवृत्त झाली.

चालू घडामोडी : १९ नोव्हेंबर

शाहरुख खानच्या हस्ते इफ्फीचे उद्घाटन

  • ४८व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) गोव्यातील दोनापॉल श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर २० नोव्हेंबर रोजी अभिनेता शाहरुख खान याच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
  • उद्घाटनानंतर सायंकाळी ७ वाजता  इराणमधील निर्माता मजिद मजिदी याचा ‘बियाँड दि क्लाऊड्स’ हा सिनेमा प्रदर्शित केला जाईल. या चित्रपटाला लंडन फिल्म फेस्टिव्हलमध्ये उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.
  • दहा दिवसांच्या या चित्रपट महोत्सवात एूकण ८२ देशांचे १९५ चित्रपट इफ्फीत दाखवले जाणार आहेत.
  • इफ्फीचे यावर्षीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे दाखविण्यात येणाऱ्या एकूण चित्रपटांची माहिती संकेतस्थळावर टाकण्यात येणार आहे.
  • एकूण १० जागतिक प्रिमियर, १० आशियाई चित्रपट प्रिमियर होतील काही हिंदी चित्रपटांचेही प्रिमियर होणार आहेत.
  • इंडियन पॅनोरमा विभागात ९ चित्रपट दाखवले जातील. ऑस्करसाठी भारतातून नामांकन मिळविलेला ‘न्युटन’ हा सिनेमाही प्रदर्शित केला जाणार आहे. 
  • कॅनडियन सिने दिग्दर्शक अ‍ॅटॉम इगोनॉय यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. १५ चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले असून अनेक टीव्ही मालिका त्यांच्या नाववर आहेत.
  • ‘नेक्स्ट ऑफ कीन’ या त्यांच्या चित्रपटास मानहेम, हिदेलबर्ग येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला होता. 
  • यंदाच्या इफ्फीत बॉलिवूड सुपरस्टर अमिताभ बच्चन यांना ‘पर्सनॅलिटी ऑफ द इयर’ पुरस्कार यांना दिला जाणार आहे.
  • बच्चन यांची चित्रपट कारकीर्द जवळपास अर्धशतकाची असून, त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ४ वेळा राष्ट्रीय तर १५ वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.
  • सिने जगताशी संबंधित देश, विदेशीतील सुमारे ७००० प्रतिनिधींनी इफ्फीसाठी नोंदणी केली आहे.

झिम्बाब्वेत सत्तापालट

  • झिम्बाब्वेतील सत्ताधारी पक्ष झेडएएनयू-पीएलने रॉबर्ट मुगाबे यांना पक्षाच्या नेतेपदावरून हटवत त्यांचे प्रतिस्पर्धी एमरसन म्नांगाग्वा यांची पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती केली आहे.
  • मुगाबे यांची पत्नी ग्रेस यांनी देशाची सूत्रे आपल्या हाती यावेत, अशी मुगाबे यांची इच्छा होती. परंतु ग्रेस यांना यापूर्वीच पक्षाने निलंबित केले आहे.
  • ग्रेस यांच्याविरुध्द उपराष्ट्राध्यक्ष एमरसन म्नांगाग्वा हे प्रतिस्पर्धी म्हणून उभे राहिले होते. त्यामुळे मुगाबे यांनी म्नांगाग्वा यांना बरखास्त केले होते.
  • त्यामुळे लष्कराने सत्तेची सूत्रे आपल्या हाती घेऊन मुगाबेंना नजरकैदेत ठेवले होते. मुगाबेंना जनरल, झिम्बाब्वेची जनता आणि सत्तारूढ पक्षाकडून मोठ्या विरोधाचा सामना करावा लागत होता.
  • स्वातंत्र्यानंतर (१९८०) देशातील जनता पहिल्यांदाच उत्साहित झाल्याचे दिसून आली. त्यांनी मुगाबेंच्या निरंकुश सत्तेला विरोध सुरू केला होता.
  • ३७ वर्षे झिम्बाब्वेच्या सत्तेमध्ये राहिलेल्या रॉबर्ट मुगाबे (जगात सर्वाधिक काळ सत्तेत राहणारे नेते) यांच्याजागी आता उपाध्यक्ष एमरसन म्नांगाग्वा यांच्याकडे सत्ता येण्याची शक्यता आहे.
  • एमरसन हे झिम्बाब्वेमध्ये क्रोकोडाईल नावाने ओळखले जातात. ते गेली अनेक दशके मुगाबे यांना राजकीय क्षेत्रात मदत करण्याचे काम करत होते. २०१४ साली एमरसन झिम्बाब्वेचे उपराष्ट्राध्यक्ष बनले.
  • अत्यंत कठोर नेता म्हणूनही ते ओळखले जातात. मुगाबे यांनी घेतलेले निर्णय कठोरपणे राबवण्यासाठीच त्यांनी या शक्तीचा वापर केला.
  • जनतेमध्ये लोकप्रियता मिळवण्यापेक्षा सुरक्षा दले आणि सैन्यामध्ये त्यांनी स्वतःचे पाठिराखे तयार केले. त्याचाच उपयोग त्यांना या लष्करी बंडाच्या वेळेस होत आहे.

चालू घडामोडी : १८ नोव्हेंबर

मानुषी छिल्लरला मिस वर्ल्ड किताब

  • सौंदर्याच्या जगतातील सर्वोच्च ‘मिस वर्ल्ड २०१७’ या स्पर्धेत भारताची मानुषी छिल्लर विजेती ठरली आहे. मानुषी ६७वी मिस वर्ल्ड ठरली.
  • चीनमधील सान्या येथे आयोजित मिस वर्ल्ड २०१७ स्पर्धेत जगभरातून आलेल्या ११८ सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता.
  • त्यापैकी भारत, इंग्लंड, आणि मेक्सिको या देशांच्या सौंदर्यवतींनी अंतिम तीनमध्ये स्थान पटकावले.
  • यानंतर मिस वर्ल्डच्या किताब मानुषी छिल्लरला मिळाल्याचे जाहीर करण्यात आले. मेक्सिकोची अँड्रीया मेझा सेकंड रनरअप तर इंग्लंडची स्टेफनी हिल फर्स्ट रनरअप ठरली.
  • प्रियंका चोप्रानंतर (२०००) १७ वर्षांनी भारताच्या सौंदर्यवतीला मिस वर्ल्डचा किताब मिळाला आहे.
  • ७ मे १९९७ रोजी दिल्लीमध्ये जन्मलेली मानुषी छिल्लर ही मूळची हरयाणाची आहे. ती मेडिकलची विद्यार्थिनी असून तिला हृदय शल्य चिकित्सक व्हायचे आहे.
 भारताकडे सहाव्यांदा मुकूट 
  • १९६६मध्ये भारतीय सौंदर्यवती रीता फारिया विश्वसुंदरी ठरली आणि हा मुकूट प्रथमच आशिया खंडात आला.
  • त्यानंतर ऐश्वर्या राय (१९९४), डायना हेडन (१९९७), युक्ता मुखी (१९९९) आणि प्रियंका चोप्रा (२०००) यांनी मिस वर्ल्ड किताब भारताला जिंकून दिले.
  • मानुषी छिल्लर हा किताब जिंकणारी सहावी भारतीय सौंदर्यवती ठरली.

अंबानी कुटुंब आशियात सर्वात श्रीमंत

  • फोर्ब्ज नियतकालिकातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या श्रीमंत कुटुंबांच्या यादीत आशियातील सर्वात श्रीमंत कुटुंब म्हणून मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाची निवड झाली आहे.
  • या कुटुंबाची एकूण संपत्ती १९ अब्ज डॉलरवरून ४४.८ अब्ज अमेरिकी डॉलरवर गेली आहे.
  • यामुळे सॅमसंगच्या ली कुटुंबाला अंबानी कुटुंबाने मागे टाकले आहे. दुसऱ्या स्थानी ली कुटुंब तर तिसऱ्या क्रमांकावर हाँग काँगचे क्वोक कुटुंब आहे.
 देशातील काही श्रीमंत कुटुंबे 
  • मुकेश अंबानी (४४.८ अब्ज डॉलर)
  • प्रेमजी (१९.२ अब्ज डॉलर)
  • हिंदुजा (१८.८ अब्ज डॉलर)
  • मित्तल (१७.२ अब्ज डॉलर)
  • मिस्त्री (१६.१ अब्ज डॉलर)
  • बिर्ला (१४.१ अब्ज डॉलर)
  • गोदरेज (१४ अब्ज डॉलर)

चालू घडामोडी : १७ नोव्हेंबर

मूडीजकडून भारताच्या मानांकनात सुधारणा

  • अमेरिकास्थित मूडीज या संस्थेने भारताचे सार्वभौम ऋण मानांकन एका पायरीने वाढवून ‘बीएए२’ केले आहे.
  • मूडीजने भारताच्या लोकल आणि फॉरेन करन्सी एश्युअर रेटिंगमध्ये बीएए३ वरुन बीएए२ असा बदल केला आहे.
  • आर्थिक व संस्थात्मक सुधारणांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेतील वृद्धीची शक्यता अधिक चांगली झाली असल्याने मूडीजने भारताच्या मानांकनात वाढ केली आहे.
  • या रेटिंग वाढवण्याचा तात्काळ फायदा म्हणजे भारताला आंतरराष्ट्रीय कर्जे घेणे सुसह्य होणार असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारताची पतही सुधारणार आहे.
  • सुमारे १३ वर्षांनंतर भारताच्या मानांकनात मूडीजकडून सुधारणा करण्यात आली आहे. याआधी २००४मध्ये मूडीजने भारताचे मानांकन सुधारून ‘बीएए३’ केले होते.
  • मूडीजने भारताचे मानांकन आता ‘बीएए२’ केले असले तरी हे मानांकन गुंतवणूक श्रेणीतील सर्वांत खालची पायरी आहे. याचाच अर्थ भारताला अजून खूप मजल मारावी लागणार आहे.
 मूडीजबद्दल 
  • पतमानांकन (रेटिंग) देण्याच्या पद्धतीची सुरुवात १९०९मध्ये जॉन मूडी यांनी केली. ‘मूडीज कॉर्पोरेशन’ ही मूडीज इन्व्हेस्टर्सची कंपनी असून, ती क्रेडिट रेटिंग देण्याचे आणि आर्थिक बाबतीत संशोधन करण्याचे काम करते.
  • सध्या ‘मूडीज’ जागतिक भांडवल बाजाराचा महत्त्वपूर्ण भाग असून, ही कंपनी वित्तीय बाजाराला क्रेडिट रेटिंग (पतमानांकन), रिसर्च टूल आणि विश्लेषणाची सेवा पुरवते.
  • कोणत्याही देशाचे रेटिंग निर्धारित करताना देशावरील कर्ज आणि ते चुकविण्याची क्षमता लक्षात घेतली जाते.
  • या शिवाय रेटिंग एजन्सी त्या देशातील आर्थिक सुधारणांची गती आणि त्याचा भविष्यावर पडणारा प्रभाव आदी बाबी लक्षात घेऊन रेटिंग देतात.
  • या शिवाय रेटिंग निर्धारित करताना देशातील राजकीय स्थिती, आखलेली धोरणे, आयात, निर्यात आदी बाबीही पाहिल्या जातात.
  • मूडीजकडून देण्यात येणारे सार्वभौम मानांकन त्या देशाच्या गुंतवणूक वातावरणाचे निदर्शक असते. कोणत्याही देशातील गुंतवणूक जोखीम त्यातून गुंतवणूकदारांना कळते.
  • मूडीजने ग्रेड देण्यासाठी ९ विभाग निश्चित केले आहेत. AAA, AA, A, BAA, BA,B, CAA, CA आणि C असे हे नऊ विभाग आहेत. या शिवाय १,२,३ असे उपविभागही असतात.
  • यामधील AAA रेटिंग गुंतवणूक करण्यासाठी सर्वात यौग्य देश अथवा कंपनी तर C रेटिंग गुंतवणूक करण्यात सर्वात अयोग्य देश अथवा कंपनी दर्शवते.  

महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी

  • महाराष्ट्र राज्य सरकारने पर्यावरण रक्षणासाठी राज्यात सरसकट प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी कायद्यात सुधारणा केली जाणार आहे.
  • राज्यात सध्या ५० मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी आहे. मात्र आता सरसकट प्लास्टिक बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • यासाठी कायद्यात सुधारणा केली जाणार आहे. याबाबत आगामी अधिवेशनात दुरुस्ती विधेयक मांडण्यात येईल.
  • कायद्याची अंमलबजावणी न करणाऱ्या हॉटेल्स आणि विक्रेत्यांवर फौजदारी कारवाईची तरतूदही करण्यात येणार आहे.
  • नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना ३ ते ६ महिने शिक्षा आणि परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
  • प्लास्टिक बंदीमुळे शीतपेय आणि पाण्याची बाटलीवर बंदी येणार आहे. अशा परिस्थितीत काचेचा बाटल्या हा पर्याय उपलब्ध असेल. तर प्लास्टिक पिशव्यांवरऐवजी कापडी पिशव्यांचा पर्याय उपलब्ध करुन दिला जाईल.
  • महाराष्ट्र पर्यावरण मंत्री: रामदास कदम

हिंदी साहित्यिक कुंवर नारायण यांचे निधन

  • भारतीय साहित्यात सर्वश्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित हिंदीतील बुजुर्ग साहित्यिक कुंवर नारायण यांचे १५ नोव्हेंबर रोजी निधन झाले. 
  • उत्तर प्रदेशातील फैजाबाद येथे १९ सप्टेंबर १९२७ रोजी कुंवर नारायण यांचा जन्म झाला. फैजाबाद आणि अयोध्या या ठिकाणी त्यांचे शालेय शिक्षण झाले.
  • बौद्ध समाजवादी नेता विद्वान आचार्य नरेंद्रदेव आणि गांधीवादी आचार्य कृपलानी यांचा कुंवर नारायण यांच्यावर विलक्षण प्रभाव होता.
  • आचार्य कृपलानींबरोबर दिल्लीला त्यांच्या ‘निजिल’ या पत्रिकेच्या कामासाठी त्यांनी मदत केली. त्यामुळे त्यांची साहित्यिक आवड जोपासली गेली.
  • १९५६मध्ये त्यांचा ‘चक्रव्यूह’ हा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. हिंदी साहित्यातील ही एक प्रमुख साहित्यकृती मानली जाते.
  • अज्ञेयजींच्या १९५९ मधील ‘तिसरा सप्तक’मध्ये कुंवरजींच्या कवितांचा समावेश केल्याने त्यांना बऱ्यापैकी प्रसिद्धी मिळाली.
  • पण १९६५ मध्ये ‘आत्मजयी’ हे दीर्घकाव्य सिद्ध झाले आणि त्यांची कवी म्हणून ओळख प्रस्थापित झाली.
  • परिवेश, हम तुम (१९६१), अपने सामने (१९७९), कोई दुसरा नहीं (१९९३), इन दिनो (२००२), हाशिये का गवाह हे त्यांचे इतर काव्यसंग्रहही प्रकाशित झाले.
  • त्यांनी कथा, समीक्षालेखन, चित्रपट, संगीत, कला व इतिहास या विषयांवरही लेखन केले आहे. खोल जीवनानुभव, विपुल अध्ययन, गंभीर चिंतन यामुळे त्यांचे साहित्य लक्षणीय बनले.
  • त्यांना हिंदुस्थानी पुरस्कार, प्रेमचंद पुरस्कार, पुणे पंडित पुरस्कार, व्यास सन्मान, साहित्य अकादमी, कबीर सन्मान, पद्मभूषण, वॉर्सा (पोलंड) विद्यापीठाचे सन्मानपदक असे अनेक सन्मान मिळाले.
  • इटलीमधील ‘प्रेमिओ फेरोनिया’ हा आंतरराष्ट्रीय लेखकाला दिला जाणारा सन्मान कुंवरजींच्या रूपाने प्रथमच एका भारतीय लेखकाला मिळाला होता.

चालू घडामोडी : १६ नोव्हेंबर

दिल्लीमध्ये बीएस-VI दर्जाच्या इंधनाची विक्री

  • दिल्ली आणि एनसीआरमधील प्रदूषणाच्या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी चांगल्या दर्जाच्या इंधनाची विक्री करण्याचा निर्णय पेट्रोलियम मंत्रालयाने घेतला आहे.
  • या निर्णयामुळे एप्रिल २०१८पासून दिल्लीमध्ये सध्याच्या बीएस-IV ऐवजी बीएस-VI दर्जाच्या पेट्रोल आणि डिझेलची विक्री केली जाईल.
  • दिल्लीत गेल्या काही वर्षांपासून प्रदूषणाची समस्या बिकट झाली आहे. धुरक्यामुळे दिल्लीतील प्रदूषणाचे संकट दिवसागणिक गंभीर होत आहे.
  • दिल्लीत बीएस-VI दर्जाच्या पेट्रोल, डिझेलची विक्री १ एप्रिल २०२० पासून केली जाणार होती.
  • मात्र, प्रदूषणामुळे दिल्लीची अवस्था अतिशय गंभीर झाल्याने दोन वर्षे आधीच बीएस-VI दर्जाच्या इंधनाची विक्री सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
  • सध्या दिल्लीमध्ये बीएस-IV दर्जाच्या इंधनाची विक्री होते. यानंतर बीएस-V दर्जाचे इंधन दिल्लीतील पेट्रोल पंपांवर विक्रीसाठी उपलब्ध होणार होते.
  • मात्र, प्रदूषणाची समस्या बिकट झाल्याने थेट बीएस-VI दर्जाच्या इंधनाची विक्री करण्याचा निर्णय पेट्रोलियम मंत्रालयाने घेतला.
  • पेट्रोलियम मंत्रालयाच्या या निर्णयामुळे कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी होण्यास आणि पर्यायाने प्रदूषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

एमएसडी स्थापनेसाठी कार्यकारी समिती

  • दिल्लीतील प्रख्यात ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’च्या धर्तीवर राज्यात ‘महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा’ (एमएसडी) सुरु करण्यासाठी राज्य सरकारने कार्यकारी समितीची स्थापना केली आहे.
  • देशभरातील रंगकर्मींची पंढरी म्हणून ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ला ओळखले जाते.
  • महाराष्ट्रातील तरूण रंगकर्मींना नाटकांसाठी हक्काची जागा उपलब्ध व्हावी आणि रंगभूमीविषयक नव्या संकल्पना आणि प्रयोगांना वाव मिळावा यासाठी ‘महाराष्ट्र स्कूल ऑफ ड्रामा’ सुरु करण्यात येणार आहे.
  • एमएसडीमध्ये मराठी लोककला व लोकनाट्याचा अभ्यास करता येईल. रंगभूमीच्या सर्वांगिण विकासाला वाहिलेले हे संकुल असेल.
  • दादासाहेब फाळके चित्रनगरीचे व्यवस्थापकीय संचालक हे कार्यकारी समितीचे अध्यक्ष असतील, तर सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे या समितीतील सदस्य असतील.
  • आगामी सहा महिन्यांमध्ये अभ्यासगट राज्य सरकारला अहवाल सादर करणार आहे.

रॉजर फेडरर सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू

  • फोर्ब्स मासिकाच्या अहवालानुसार, गोल्फपटू टायगर वुड्सला मागे टाकत रॉजर फेडरर वैयक्तिक क्रीडा प्रकारात सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू ठरला आहे.
  • रॉजर फेडररने आतापर्यंत बक्षिसांच्या माध्यमातून ११ कोटी २ लाख ३५ हजार ६८२ अमेरिकी डॉलर्सची कमाई केली आहे.
  • फेडररने टायगर वुड्सच्या ११ कोटी ६१ हजार अमेरिकी डॉलर्स या कमाईला मागे टाकत सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू हा मान मिळवला.
  • जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या फेडररच्या खात्यात यावर्षीच्या ऑस्ट्रेलिया आणि विम्बल्डन या दोन ग्रँडस्लॅम स्पर्धांची विजेतेपदे जमा आहेत.

चालू घडामोडी : १५ नोव्हेंबर

‘आसियान’चे नेते प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे

  • येत्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सियान शिखर परिषदेच्या नेत्यांना दिलेले आमंत्रण त्यांनी स्वीकारले आहे.
  • त्यामुळे आसियान शिखर परिषदेचे नेते २०१८च्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख अतिथी म्हणून येणार आहेत.
  • २०१५मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा तर २०१६मध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रांस्वा ओलांद हे प्रजासत्ताक दिनाचे मुख्य अतिथी होते.
  • ०१७मध्ये संयुक्त अरब अमिरातीचे युवराज शेख मोहम्मद बिन झायेद अल नह्यान प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी प्रमुख पाहुणे होते.

पश्चिम बंगालला रसगुल्ल्याचे जीआय मानांकन

  • पश्चिम बंगालने ओडिशासोबत गेल्या दोन वर्षांपासून ‘रसगुल्ला’च्या जीआय मानांकनासाठी सुरु असलेली लढाई जिंकली आहे.
  • दोन्ही राज्यांनी रसगुल्ला आपला असल्याचा दावा करत जीआय मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता.
  • मात्र रसगुल्ला हा मूळचा आणि भौगोलिकदृष्ट्या पश्चिम बंगालचाच असल्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे.
  • यामुळे आता अधिकृतपणे रसगुल्ला पश्चिम बंगालचा असल्याचे सिद्ध झाले असून, या राज्याला रसगुल्ल्याचे जीआय मानांकन मिळाले आहे.
  • न्यायालयाच्या या निर्णयाचा फायदा पश्चिम बंगालमधील लाखो रसगुल्ला उत्पादकांना होणार आहे.
 भौगोलिक उपदर्शन (जीआय) म्हणजे काय? 
  • जीआय म्हणजे जिऑग्राफिकल इंडिकेशन अर्थात भौगोलिक उपदर्शन. हा बौद्धिक संपदा विशेष अधिकार म्हणून ओळखला जातो.
  • उत्पादनास स्वामित्व म्हणजेच कायदेशीर हक्क प्राप्त करून देण्यासाठी शासनातर्फे वैयक्तिक उत्पादनासाठी पेटंटची, तर सामूहिक उत्पादनासाठी भौगोलिक उपदर्शन (जीआय)ची मान्यता दिली जाते. 
  • एखादी संस्था, जात, जमात किंवा समूह काही विशिष्ट पदार्थांच्या निर्मितीसाठी जोडलेला असेल तर त्या समूहाला हा बौद्धिक संपदा भौगोलिक उपदर्शन या नावाने मिळतो.
  • या माध्यमातून या सलग्नित समूहाला आपला पदार्थ अथवा वस्तू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नेण्याची संधी मिळते.
  • भौगोलिक उपदर्शन नोंदणीचा कायदा भारतात प्रस्तावित केला गेला आणि प्रत्यक्षात २००१साली आला. विशिष्ट भागातून तयार होणाऱ्या विशेष पदार्थाला भौगोलिक उपदर्शन कायद्याअंतर्गत नोंद करता येते.
  • जागतिक व्यापार संघटनेच्या (डब्ल्यूटीओ) बौद्धिक संपदा विषयक करारातून भारतात आलेल्या अनेक कायद्यांपैकी सदर भौगोलिक उपदर्शन नोंदणी कायदा हा एक आहे.
  • एकूण २३ जीआयसह महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक जीआय मिळविणारे राज्य आहे. 
  • मानांकनाचे फायदे
    • जागतिक बाजारात मुल्यवर्धी.
    • देशातील ब्रॅंड म्हणनू ओळख.
    • देशांतर्गत बाजारातही योग्य भाव.
जीआय मिळालेली महाराष्ट्रातील कृषी उत्पादने
जळगावची केळी मराठवाड्यातील केसर आंबा
डहाणू घोलवडचा चिकू आंबेमोहर (पुणे) तांदूळ
नाशिकची द्राक्ष वायगावची हळद
सिंधुदुर्ग-रत्नागिरीचा कोकम कोरेगावचा वाघ्या घेवडा
वेंगुर्ल्याचा काजू लासलगावचा कांदा
बीडची सीताफळे जालन्याची मोसंबी
पुरंदरचे अंजीर कोल्हापूरचा गूळ
नागपूरची संत्री आजऱ्याचा घनसाळ तांदूळ`
भिवापूर (नंदुरबार) मिरची सांगलीचे बेदाणे
सोलापुरी डाळिंब जळगावची भरताची वांगी
मंगळवेढ्याची ज्वारी महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी
नवापूरची तूरडाळ

सौदी अरेबियामध्ये ‘योग’ खेळाचा दर्जा

  • कट्टर इस्लामिक देश असलेल्या सौदी अरेबियाने जगभरात प्रसार पावलेल्या योग व्यायामप्रकाराला खेळाचा दर्जा दिला आहे.
  • सौदी अरेबियाने क्रीडाप्रकार म्हणून योग शिकवण्याला अधिकृत परवानगी दिली आहे. त्यामुळे सौदीमध्ये अधिकृत परवाना घेऊन योग शिकवता येणार आहे.
  • अरब योग फाऊंडेशनच्या संस्थापक असलेल्या नोफ मारवाई यांनी सौदीमध्ये योगला खेळाचा दर्जा मिळावा म्हणून दीर्घकाळापासून अभियान राबवले होते.
  • सौदीमध्ये योगला खेळ म्हणून मान्यता मिळवून देण्याचे श्रेय नोफ यांनाच जाते. त्यांनाच सौदीमधील पहिली योग प्रशिक्षक म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
  • २७ सप्टेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने योगला जागतिक मान्यता दिली होती. तसेच २१ जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून घोषित केला होता.  

मोरक्कोचा ‘आधार’ कार्यक्रम सुरू मानस

  • आफ्रिकेतील दुसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था आणि उत्तर आफ्रिकेतील भारताचा महत्वाचा सहकारी देश असलेल्या मोरक्कोलाही त्यांच्या देशात ‘आधार’ सारखा कार्यक्रम सुरू करायचा आहे.
  • भारतात ज्या पद्धतीने आधार क्रमांक विविध योजनांशी लिंक करण्यात आले आहे, त्याचपद्धतीने त्यांच्या देशातही ही योजना राबवायची आहे.
  • ही प्रक्रिया जाणून घेण्यासाठी मोरक्कोतून आलेल्या गृहमंत्री नुरूद्दीन बोतायब यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचा १० दिवसीय दौरा ६ नोव्हेंबरला संपला.
  • या शिष्टमंडळात सामाजिक-आर्थिक घटकांशी जोडलेले आणि मोरक्को नॅशनल बँकेशी निगडीत प्रतिनिधी सहभागी झाले होते.
  • त्यांनी आधारबाबत भारताचा अनुभव, गुन्हे आणि गुन्हेगार ट्रॅकिंग नेटवर्क आणि प्रणाली (सीसीटीएनएस), डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, गॅस सबसिडी आणि डिजिटल बँकिंग प्रणालीसारख्या फायद्यांचा अभ्यास केला.
  • दहशतवादविरोधी अभियानात उत्तर आफ्रिकेत मोरक्को भारताचा एक महत्वाचा भागीदार म्हणून समोर येत आहे.

अमिताभ बच्चन यांना इफ्फीचा पर्सनॅलिटी ऑफ द ईयर पुरस्कार

  • गोव्यात होणाऱ्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा (इफ्फी) पर्सनॅलिटी ऑफ द ईयर पुरस्कार प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांना प्रदान केला जाणार आहे.
  • बच्चन यांची चित्रपट कारकिर्द जवळपास अर्धशतकाची असून त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ४ वेळा राष्ट्रीय तर १५ वेळा फिल्मफेअर पुरस्कार दिला गेला आहे.
  • २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान हा महोत्सव गोव्यात होत आहे.