चालू घडामोडी : ३ नोव्हेंबर

कवी सच्चिदानंदन यांना एळ्ळुथाचन पुरस्कार

  • विख्यात मल्याळी कवी के सच्चिदानंदन यांची केरळ सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठेच्या एळ्ळुथाचन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ५ लाख रुपये रोख व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • मल्याळी साहित्यविश्वात अत्यंत मानाचे स्थान असलेल्या सच्चिदानंदन यांचा जन्म १९४६साली त्रिचूर जिल्ह्यातील पल्लूत येथे झाला.
  • जीवशास्त्र या विषयात पदवी घेतल्यानंतर, त्यांनी इंग्रजी साहित्यात एमए व कालिकत विद्यापीठातून पीएचडीही मिळवली.
  • सुमारे २५ वर्षे इंग्रजीचे अध्यापन केल्यानंतर ते साहित्य अकादमीच्या इंग्रजी नियतकालिकाचे संपादन करण्यासाठी दिल्लीला गेले. नंतर ते या अकादमीचे सचिव, मुख्याधिकारी बनले.
  • सच्चिदानंदन हे मल्याळी साहित्यातील महत्त्वाचे आणि संवेदनशील कवी मानले जातात. सुरुवातीला केरळ पत्रिकेतून त्यांच्या कविता प्रसिद्ध होत होत्या.
  • सच्चिदानंदन यांचा ‘अंचुसूर्यन’ हा पहिला काव्यसंग्रह १९७१ मध्ये आला. त्या आधी ‘कुरुक्षेत्रम’ हा आधुनिक काव्याचा परामर्श घेणारा त्यांचा ग्रंथ प्रसिद्ध झाला होता.
  • आत्मगीता, पीडनाकालम (काव्य), शक्तन तंपुरान, गांधी (नाटक), पाब्लो नेरुदा, अन्वेषनंगल (गद्य) यांसारखी ५०हून अधिक पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.
  • सुमारे २० भाषांमधून त्यांच्या कविता अनुवादित झाल्या असून चंद्रकांत पाटील यांनी त्या मराठीतही आणल्या आहेत.
  • सामाजिक भान असलेले सच्चिदानंदन देशात विचारवंतांचा आवाज दाबला जात असल्याने व्यथितही झाले होते.
  • प्रा. एम एम कलबुर्गी यांच्या हत्येनंतर साहित्य अकादमीने मिळमिळीत भूमिका घेतल्याबद्दल त्यांनी सर्व पदांचा राजीनामा दिला.
  • अत्यंत प्रभावी वक्ते, अनुवादक, संपादक, नाटककार असे बहुआयामी त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे.
  • २०११च्या साहित्याच्या नोबेल पुरस्काराच्या यादीत सच्चिदानंदन यांना दहावे मानांकन मिळाले होते. केरळ साहित्य अकादमीचा पुरस्कार त्यांना आतापर्यंत ७ वेळा मिळाला आहे.
  • इण्डो-पोलिश फ्रेंड्स मेडल, साहित्य अकादमी (दिल्ली), तसेच कुसुमाग्रज पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आले आहे.

भारतीय महिला आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत

  • भारतीय महिला हॉकी संघाने आशिया चषक स्पर्धेत गतविजेत्या जपानला ४-२ असे पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
  • भारताकडून उपांत्य फेरीत कझाकिस्तानविरुद्ध गोलची हॅटट्रिक करणाऱ्या ड्रॅगफ्लिकर गुरजीत कौरने २ गोल, तर लालरेमसियम व नवजोत कौरने प्रत्येकी १ गोल नोंदवला.
  • आशिया चषक विजेतेपदासाठी अंतिम सामन्यात भारतीय संघासमोर चीनचे आव्हान असणार आहे. भारताने याआधी साखळी लढतीत चीनला ४-१ गोलने नमवले होते.
  • त्यानंतर, सामन्यातील उर्वरित वेळेत भारतीय संघाने बचावावर भर दिला. भारताचा हा बचाव भेदण्यात जपान संघाला अखेरपर्यंत यश आले नाही.
  • जपानसाठी शिहो सुजीने १७व्या मिनिटाला आणि युई इशिबाशीने २८व्या मिनिटाला प्रत्येकी एक-एक गोल केला.

राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत भारत वरचढ

  • ऑस्ट्रेलियाच्या ब्रिस्बेन शहरात सुरु असलेल्या राष्ट्रकुल नेमबाजी स्पर्धेत चौथ्या दिवशी भारतीय नेमबाजांनी आपली चमकदार कामगिरी कायम ठेवली आहे.
  • प्रकाश नांजप्पा, अमनप्रीतसिंग आणि जितू राय यांनी ५० मीटर पिस्तूल प्रकारात अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक जिंकत क्लीन स्वीप केले.
  • याआधी भारतीय पिस्तूल नेमबाजांनी १० मी. एअर पिस्तूल प्रकारातही शाहजार रिझवीने सुवर्ण, ओकांरसिंग याने रौप्य आणि जितू रायने कांस्यपदक जिंकत क्लीन स्वीप केले होते.
  • अनुभवी नेमबाज ४१वर्षीय प्रकाशने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे.
  • याआधी त्याला २०१४साली झालेल्या आशियाई क्रीडा व २०१३साली झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेच्या १० मी. प्रकारात कांस्य पदकावर समाधान मानावे लागले होते.
  • याशिवाय भारताच्या अंकुर मित्तलने डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक जिंकले. भारताची आता या स्पर्धेत एकूण १५ पदके झाली आहेत.

मोहम्मद अली जीना यांच्या कन्येचे निधन

  • कायदा-ए-आझम आणि पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जीना यांच्या कन्या दिना वाडिया यांचे वयाच्या ९८व्या वर्षी न्युयॉर्क येथे निधन झाले.
  • मोहम्मद अली जीना आणि रतनबाई पेटिट या दाम्पत्याच्या दिना या कन्या तर, नुस्ली वाडिया यांच्या आई होत्या.
  • दिना यांचा जन्म १५ ऑगस्ट १९१९ रोजी मध्यरात्री झाला होता. त्यानंतर दिना यांनी वयाच्या १७व्या वर्षी पारशी उद्योगपती नेविला वाडिया यांच्याशी लग्न केले.
  • पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल मुशर्रफ यांच्या कार्यकाळात २००४मध्ये त्यांनी पाकिस्तानला शेवटची भेट दिली होती.

लुइस हॅमिल्टनला फॉम्युला वन जगज्जेतेपद

  • मर्सिडिझ संघाचा ब्रिटीश ड्रायव्हर लुइस हॅमिल्टनने चौथ्यांदा फॉम्युला वन मालिकेचे जगज्जेतेपद पटकावले आहे.
  • रेड बुल संघाचा मॅक्स व्हर्स्टाप्पेनने १ तास ३६ मिनिटे २६.५५० सेकंदांमध्ये शर्यत पूर्ण करून मॅक्सिकन ग्रांप्रीचे विजेतेपद पटकावले.
  • परंतु मॅक्सिकन ग्रांप्रीपूर्वीच हॅमिल्टनने गुणतक्त्यातील अग्रस्थान टिकवून ठेवले होते, तर फेरारीचा सॅबेस्टियन व्हिटेल हा दुसऱ्या स्थानी होता.
  • व्हिटेलने मॅक्सिकन ग्रांप्री जिंकली तरी हॅमिल्टनने पहिल्या पाचमध्ये क्रमांक पटकावल्यास त्याचे जगज्जेतेपद निश्चित होणार होते.
  • मात्र, पहिल्याच फेरीत व्हिटेल व हॅमिल्टनची धडक झाल्यामुळे दोघांनाही शर्यतीदरम्यान पिट-स्टॉप घ्यावा लागला.
  • परिणामी व्हिटेलला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले आणि नवव्या स्थानावर राहूनही हॅमिल्टनचे जगज्जेतेपद निश्चित झाले.
  • हॅमिल्टनने यापूर्वी २००८, २०१४ आणि २०१५साली फॉम्युला वन जगज्जेतेपदावर नाव कोरले आहे.
  • सर्वाधिक वेळा जगज्जेतेपद पटकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो आता व्हिटेलसह संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानी आहे. व्हिटेलच्या नावावरही ४ जगज्जेतीपदे जमा आहेत.
सर्वाधिक वेळा फॉर्म्युला वन मालिकेचे जगज्जजेतेपद पटकावणारे रेसर
रेसर एकूण जगज्जेतीपदे
मायकेल शुमाकर
ज्युआन मॅन्युएल फँगिओ
लुईस हॅमिल्टन
सॅबेस्टियन व्हिटेल
अॅलियन प्रॉस्ट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा